शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार शहरात घाणीचे साम्राज्य; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:51 IST

पावसाळ्यापूर्वीची कामे कशी हाेणार?

जव्हार : कोरोनाकाळात जव्हार शहराच्या स्वच्छता योजनेवर सरकारी संकट कोसळले आहे. निधीअभावी कर्मचारी कमी केल्यामुळे नगर परिषदेवरील सफाईचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वच्छ शहर, सुंदर शहर अशी ओळख असलेल्या जव्हार शहरात ठिकठिकाणी व गल्लीबोळांत घाणीचे साम्राज्य दिसत असून, स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.  सफाई कामगारांची अपुरी संख्या असल्यामुळे शहराची नियमित सफाई हाेत नाही. कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या गटारी यांमुळे शहराला बकालावस्था आली आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी या काळात अपेक्षित असताना सफाई कामगारांचा तुटवडा यंदा शहरातील नागरिकांना भोवणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. मात्र, स्वछतेकडे सपशेल दुर्लक्ष झाल्यामुळे यंदाचा पावसात गटारे, नाले तुंबण्याची शक्यता आहे. तसेच नवीन नळपाणी योजनेचे कामही सुरू आहे. त्यामुळे पाइप टाकण्यासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उकरलेली मातीही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे साऱ्या रस्त्यात पसरलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तर संपूर्ण रस्त्यांवर चिखल होणार आहे, चिखलात वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वच्छता नसल्यामुळे व कीटकनाशक फवारणी केली नसल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया, कावीळ हे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत व फवारणीबाबत नगराध्यक्षांपासून नगरसेवकांपर्यंत कोणीही लक्ष घालताना दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीच स्वच्छतेविषयी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.  जव्हार शहरातील सफाईबाबत नगरपालिकेच्या स्वच्छता  विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पूर्वी ३५ सफाई मजूर सफाईसाठी कामाला होते. मात्र, निधीअभावी मजुरांची संख्या कमी करून १५ करण्यात आली आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. नगर परिषदेला स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून निधी दिला जात होता. स्वच्छतेचा वर्षाचा ठेका एक कोटी सहा लाखांचा होता. मात्र, या वर्षापासून हा निधी येणे बंद झाले आहे. 

नगर परिषदेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. केवळ ५५ लाख रुपये स्वच्छतेसाठी शिल्लक आहेत. निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल. - ॲड. प्रसन्ना भोईर, नगरसेवक, जव्हार नगरपरिषद

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या