शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच गणवेशामुळे मुले खूश!

By admin | Updated: May 23, 2016 02:32 IST

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून घरपोच गणवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपूर्वी मुलांपर्यंत गणवेश पोहोचलेले असतील

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून घरपोच गणवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपूर्वी मुलांपर्यंत गणवेश पोहोचलेले असतील. मुलांमध्ये शाळेत येण्याची ओढ वाढीस लागावी, याकरिता हा निर्णय घेतल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. उल्हासनगर पालिका शिक्षण मंडळ नेहमीच वादात राहिले आहे. शाळांच्या पटसंख्येवर ६ हजार ६०० विद्यार्थी दाखवले आहेत. त्यापैकी ३० टक्के विद्यार्थी बोगस दाखवल्याचा आरोप होत आहे. घरोघर गणवेश पाठवले तर विद्यार्थ्यांची नेमकी संख्या समजेल व आरोपांची शहानिशा करता येईल. तसेच मंडळाची प्रतिमा सुधारण्याकरिता शाळा डिजिटल करणे, मुलांना घरपोच गणवेश देणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप पहिल्याच आठवड्यात करणे आदी उपक्रम राबवण्याचा संकल्प केल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले. एकीकडे प्रतिमा सुधारण्याकरिता वरील उपक्रम राबवतानाच दुसरीकडे पालिका प्रशासनाने बोगस विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुढील महिन्यात विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणात बोगस विद्यार्थी आढळल्यास संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.शैक्षणिक साहित्य, गणवेश, चिक्की यांची खरेदी करताना पटसंख्या विचारात घेतली जाते. विद्यार्थ्यांची कमी संख्या असताना जादा खरेदी केल्याने मंडळाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे लेंगरेकर यांनी कबूल केले. शाळांच्या पुनर्बांधणीसह डिजिटल शाळांची संकल्पना उपायुक्त लेंगरेकर यांची आहे. शाळांना २५ लाखांच्या निधीतून संगणकांसह प्रोजेक्टर पुरवले आहे. डिजिटल शाळांची संकल्पना राबवायची आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवीचे वर्ग सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)