शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

हट्टी रहिवाशांपुढे पालिकेने टेकले गुडघे

By admin | Updated: September 13, 2016 02:28 IST

वारंवार सूचना देऊनही धोकादायक इमारतींमधील रहिवासी इमारत खाली करण्यास तयार नसल्याने आता हतबल पालिकेने या इमारतींचा कुठलाही भाग कललेला

ठाणे : वारंवार सूचना देऊनही धोकादायक इमारतींमधील रहिवासी इमारत खाली करण्यास तयार नसल्याने आता हतबल पालिकेने या इमारतींचा कुठलाही भाग कललेला किंवा वाकलेला दिसला तर न चुकता कळवा, असे आवाहन केले आहे. यामुळे धोकादायक इमारत अगदी पडण्याच्या स्थितीत आली तर त्या वेळी तरी रहिवाशांना बाहेर काढून जीवितहानी टाळता येईल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वेळोवेळी नोटिसांद्वारे इमारत राहण्यास योग्य नसल्यास ती रिकामी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरल आॅडिटही करण्यास सांगितले आहे. परंतु, असे असूनही वर्षानुवर्षे काही इमारतींमधील रहिवासी इमारती रिकामी करण्यास तयार होत नसल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे आता या इमारतींत राहणाऱ्या नागरिकांना इमारतीच्या रचनेत अथवा सुरक्षेबाबत काही बदल आढळल्यास त्यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची माहिती द्यावी अथवा १८००२२२१०८ या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन आता पालिकेने केले आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या इमारतधारकांना इमारतीच्या आरसीसी फ्रेम, कॉलम, बिम, स्लॅब आदींच्या रचनेत बदल झाला असल्याचे आढळले तर त्याची माहिती द्यावी, इमारतीचे कॉलम अथवा बिम झुकल्यासारखे दिसल्यास, इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचू लागल्यास, कॉलममधील काँक्रिट पडत असल्यास, जॉइंटमध्ये भेगा पडल्याचे आढळल्यास माहिती तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही इमारत तत्काळ रिकामी करावी तसेच आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांनासुद्धा सतर्क राहण्यास सांगावे. तातडीने तज्ज्ञ आरसीसी सल्लागारांंना दाखवून प्रॉब्ज (टेकू) लावण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे. यामुळे निदान जीवितहानी तरी टळेल, अशी पालिकेची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)