शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

भाईंदर पालिकेच्या चाव्या मेहता समर्थकांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणारे जैन यांचा निषेध करत सभात्याग केला. महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याचा ठराव मांडला म्हणून भाजपने जैन यांना सभापतीपदाची दिलेली बक्षिसी असल्याची टीका सेनेने केली. मेहता विरोधी गटातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज एकमेकांना सूचक-अनुमोदक राहिल्याने बाद ठरले.

सभापतीपदासाठी जैन, तर मेहता विरोधक गटातील राकेश शाह व सुरेश खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने कमलेश भोईर यांनी अर्ज भरला होता. स्थायी समितीच्या बैठकीत दिनेश जैन व भाजप नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूट पुतळा बनवण्याच्या कामास विरोध करत प्रशासनाचा प्रस्ताव बैठकीत फेटाळून लावल्याने भाजपवर टीकेची झोड उठली. शिवसेना नगरसेवकांनी मतदान न करता संताप व्यक्त केला.

शाह व खंडेलवाल हे दोन्ही उमेदवार असताना त्यांनी एकमेकांना सूचक व अनुमोदक दिले असल्याने बुधवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी नियमाप्रमाणे त्यांचे अर्ज बाद ठरले. दरम्यान, शिवसेनेने सभात्याग केल्याने जैन यांना भाजपची १० मते मिळाली, तर काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले. जैन यांच्या विजयानंतर मेहता समर्थकांनी एकच जल्लोष केला. महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत आदी पदाधिकाऱ्यांसह मेहता, मेहता समर्थक नगरसेवक, पदाधिकारी आदींनी जैन यांचे अभिनंदन केले. निवडणुकीआधी मेहता समर्थक स्थायी समिती सदस्यांना वरसावे येथील मेहतांच्या सी एन रॉक हॉटेलमध्ये ठेवले होते, असे सूत्रांनी सांगितले.

कोरोना संसर्ग नियमांना हरताळ

कोरोना संसर्गाचे नियम पालिका मुख्यालयातच पायदळी तुडवण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग पुरते धाब्यावर बसवले. शिवाय महापौर, मेहतांसह बहुतांश नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातच मास्कही घातले नव्हते.