शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

केणी दाम्पत्य कोट्यधीशांतही वरचढ

By admin | Updated: February 17, 2017 01:57 IST

ठाणे महापालिका निवडणूक लढवत असलेल्या विविध पक्षांच्या ८०५ पैकी २०६ उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक लढवत असलेल्या विविध पक्षांच्या ८०५ पैकी २०६ उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. या कोट्यधीशांतही सर्वाधिक संपत्तीचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला गेला आहे. त्या पक्षाच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती ४ कोटी ८७ लाख ७८ हजार ४८१ रूपयांची आहे. त्या खालोखाल ३ कोटी २३ लाख ९१ हजार ५५६ एवढी सरासरी संपत्ती शिवसेनेच्या उमेदवारांकडे आहे. त्या खालोखाल भाजपाच्या उमेदवारांकडे दोन कोटी ९५ लाखांची, कॉंग्रेसच्या उमेदवारांकडे सरासरी २ कोटी २७ लाख आणि मनसेच्या उमेदवारांकजे सरासरी ५७ लाख ६७ हजारांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रांतील माहितीतून उघड झाले आहे. २०६ कोट्यधीशांपैकी सर्वाधिक संपत्तीचा मान कळव्यातील केणे दामप्त्याकडे जातो. प्रमिला केणी यांच्या नावावर ६७ कोटी ९६ लाख २४ हजार ४२ रुपयांची संपत्ती असून त्यांचे पती मुकुंद केणी यांच्या नावावर ६६ कोटी ८७ लाख ५५ हजार २७३ रूपयांची संपत्ती आहे. कोट्यधीश उमेदवारांची सर्वाधिक म्हणजे ५७ एवढी संख्या शिवसेनेच्या खाती जमा आहे. पालिका निवडणुकीच्या रिंगणातील अनेक उमेदवारांची मालमत्त्ता कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या लेखाजोख्यातून दिसते. कोट्यधीशांच्या २०६ या संख्येपैकी शिवसेनेचे ५७, भाजपाचे ४७, राष्ट्रवादीचे ३६, कॉंग्रेसचे २०, मनसेचे १३, बहुजन समाज पार्टीचा १, एमआयएमचा १ आणि अपक्षांसह इतर पक्षांचे ३१ उमेदवार कोट्यधीश आहेत. सर्वाधिक संपत्ती जाहीर करणाऱ्या पक्षात राष्ट्रवादी अव्वल स्थानी आहे. अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीत एमआयएम २६ लाख ७१ हजार १३७, समाजवादी १२ लाख ३२ हजार ४८६, बहुजन समाज पार्टी ४२ लाख ७२ हजार ७४, मुस्लिम लीग २१ लाख ०२ हजार, तोक जनशक्ती पार्टी ५ लाख ११ हजार, तर इतर आणि अपक्ष असे ५५ लाख ०४ हजारांची संपत्ती दाखविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)