शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केणी दाम्पत्य कोट्यधीशांतही वरचढ

By admin | Updated: February 18, 2017 05:04 IST

ठाणे महापालिका निवडणूक लढवत असलेल्या विविध पक्षांच्या ८०५ पैकी २०६ उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे

ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक लढवत असलेल्या विविध पक्षांच्या ८०५ पैकी २०६ उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. या कोट्यधीशांतही सर्वाधिक संपत्तीचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला गेला आहे. त्या पक्षाच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती ४ कोटी ८७ लाख ७८ हजार ४८१ रूपयांची आहे. त्या खालोखाल ३ कोटी २३ लाख ९१ हजार ५५६ एवढी सरासरी संपत्ती शिवसेनेच्या उमेदवारांकडे आहे. त्या खालोखाल भाजपाच्या उमेदवारांकडे दोन कोटी ९५ लाखांची, कॉंग्रेसच्या उमेदवारांकडे सरासरी २ कोटी २७ लाख आणि मनसेच्या उमेदवारांकजे सरासरी ५७ लाख ६७ हजारांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रांतील माहितीतून उघड झाले आहे. २०६ कोट्यधीशांपैकी सर्वाधिक संपत्तीचा मान कळव्यातील केणे दामप्त्याकडे जातो. प्रमिला केणी यांच्या नावावर ६७ कोटी ९६ लाख २४ हजार ४२ रुपयांची संपत्ती असून त्यांचे पती मुकुंद केणी यांच्या नावावर ६६ कोटी ८७ लाख ५५ हजार २७३ रूपयांची संपत्ती आहे. कोट्यधीश उमेदवारांची सर्वाधिक म्हणजे ५७ एवढी संख्या शिवसेनेच्या खाती जमा आहे. पालिका निवडणुकीच्या रिंगणातील अनेक उमेदवारांची मालमत्त्ता कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या लेखाजोख्यातून दिसते. कोट्यधीशांच्या २०६ या संख्येपैकी शिवसेनेचे ५७, भाजपाचे ४७, राष्ट्रवादीचे ३६, कॉंग्रेसचे २०, मनसेचे १३, बहुजन समाज पार्टीचा १, एमआयएमचा १ आणि अपक्षांसह इतर पक्षांचे ३१ उमेदवार कोट्यधीश आहेत. सर्वाधिक संपत्ती जाहीर करणाऱ्या पक्षात राष्ट्रवादी अव्वल स्थानी आहे. अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीत एमआयएम २६ लाख ७१ हजार १३७, समाजवादी १२ लाख ३२ हजार ४८६, बहुजन समाज पार्टी ४२ लाख ७२ हजार ७४, मुस्लिम लीग २१ लाख ०२ हजार, तोक जनशक्ती पार्टी ५ लाख ११ हजार, तर इतर आणि अपक्ष असे ५५ लाख ०४ हजारांची संपत्ती दाखविण्यात आली आहे. (प्रतिनिधी) यादी कोट्यधीशांचीकोट्यधीश उमेदवारांमध्ये पहिल्या दहामध्ये कळव्यातील राष्ट्रवादीचे केणे दामप्त्याचा वरचा क्रमांक लागला आहे. प्रमिला केणे यांनी ६७ कोटी ९६ लाख २४ हजार ४२ रुपये, मुकुंद केणे यांनी ६६ कोटी ८७ लाख ५५ हजार २७३ रुपये, रमाकांत पाटील (भाजपा) ५२ कोटी ९३ लाख ४२ हजार ८१५ रुपये, सुलोचना पाटील (राष्ट्रवादी) ४२ कोटी १५ लाख ३५१ रुपये, परिषा सरनाईक (शिवसेना) ३८ कोटी ७३ लाख ६४ हजार २८८, कविता पाटील (भाजपा) ३४ कोटी ३६ लाख १३ हजार ८४८, नजीब मुल्ला (राष्ट्रवादी) २३ कोटी ७८ लाख ९३ हजार ३६७, कृष्णा पाटील (शिवसेना) २२ कोटी ८७ लाख ९३ हजार ३६७, सोनालक्ष्मी घाग (कॉंग्रेस) २० कोटी ४४ लाख ६६ हजार ४१८ आणि हरिश्चंद्र पाटील (शिवसेना) १७ कोटी ५१ लाख ९ हजार ७२० रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.