शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीने प्रत्येक विकासकामाचा अनुपालन अहवाल द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीत विकासकामे रखडली असून, ती मार्गी लावली जात नाहीत. कोरोनाकाळात ही कामे कासवगतीने सुरू होती. मात्र, ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत विकासकामे रखडली असून, ती मार्गी लावली जात नाहीत. कोरोनाकाळात ही कामे कासवगतीने सुरू होती. मात्र, प्रत्येक विकासकामांचा अनुपालन अहवाल द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

चव्हाण यांनी शुक्रवारी सूर्यवंशी यांची भेट घेत विविध विकासकामांच्या संदर्भात दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी विकासकामे मार्गी लावण्याचा मुद्दा मांडला. प्रत्येक विकासकाम किती वेळेत पूर्ण करावे, याची मुदत ठरवलेली असते. त्याला अनुपालन अहवाल असे म्हणतात. यावेळी चव्हाण म्हणाले की, बीएसयूपी घरकुल योजनेतील साडेचार हजार लाभार्थ्यांना अद्याप घरांचे वाटप केलेले नाही. त्याचा निर्णय रखडलेला आहे. त्यावर आयुक्तांनी हा विषय तीन महिन्यांत मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले.

चव्हाण यांनी डोंबिवली स्टेशन परिसरातील मच्छी मार्केटचा विषयही मांडला. या कामाची निविदा काढलेली होती. आता पुन्हा पात्र आणि अपात्रतेचा मुद्दा कसा उपस्थित झाला. रेल्वेनेही या प्रकल्पासाठी जागा देण्याचे मान्य केले होते, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाच्या ठाकुर्ली दिशेकडील उन्नत मार्गिकेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामास गती द्यावी, असे चव्हाण म्हणाले. डोंबिवलीतील एकही एसटीपी कार्यरत नाही. तो कार्यरत करावा. सगळी घाण खाडीत सोडली जात आहे. त्यामुळे खाडी प्रदूषित होत आहे. त्याकडे मनपाच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

मनपाने परदेशी कंपन्यांसोबत करार करून स्मार्ट सिटीअंतर्गत तसेच टीपी स्कीमअंतर्गत काही विकास प्रकल्पांचे प्रस्ताव तयार केले होते. त्याचे पुढे काय झाले असा सवाल चव्हाण यांनी केला. टीपी स्कीम मार्गी लावाव्यात. या स्कीममध्ये लॅण्ड बँक आहेत. त्यांच्या विकासातून मनपाच्या तिजोरीत पैसा जमा होणार आहेत.

‘डॉक्टर, नर्स, अन्य स्टाफ नेमा’

महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ कल्याणच्या श्रीदेवी आणि डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात मिळत आहे. या योजनेंतर्गत उपचारासाठी सोय केडीएमसीच्या रुग्णालयास अन्य रुग्णालयांतून मिळावी. मनपाच्या रुग्णालयात साधन सामग्री दिली जात असताना त्याच जोडीला डॉक्टर, नर्स अन्य स्टाफ पुरविला गेला पाहिजे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले.

-------------------