शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी केडीएमसी सज्ज

By admin | Updated: September 15, 2016 02:19 IST

कल्याण-डोंबिवलीत अनंत चतुर्दशीनिमित्त गुरुवारी सार्वजनिक १७२, तर खासगी नऊ हजार ४५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत अनंत चतुर्दशीनिमित्त गुरुवारी सार्वजनिक १७२, तर खासगी नऊ हजार ४५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी शहरात सकाळी ११ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. केडीएमसीने कृत्रिम तलावांची उभारणी करण्याबरोबरच मोठ्या विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला जाणार आहे.गुरुवारी कल्याणमधील १२१, तर डोंबिवलीतील ५१ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे, तर कल्याण-डोंबिवलीतील नऊ हजार ४५० घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. केडीएमसी हद्दीतील लहानमोठ्या अशा ५२ तलावांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतीमूर्तींचे विसर्जन केले जाते. पर्यावरणरक्षणासाठी महापालिकेने डोंबिवलीत सात, तर कल्याणमध्ये तीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन करून एक नवीन सुरुवात करावी तसेच मूर्तिकारांनीही गणेशभक्तांना कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गणेशोत्सवापूर्वीच केले होते. त्याला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य व इतर साहित्य उचलण्यासाठी स्वच्छता पथके तैनात केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या सूचनेनुसार कल्याण येथील दुर्गाडी गणेशघाट, दुर्गामाता चौक, दुर्गाडी गणेश मंदिर, दूधनाका, सहजानंद चौक, गफुर डोण चौक, चिराग हॉटेल, डोंबिवली येथील रेतीबंदर गणेशघाट येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विविध ठिकाणच्या विसर्जनस्थळांवर विद्युतव्यवस्था आणि ४५ जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याचबरोबर या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान आणि जीवनरक्षक तैनात राहणार आहेत.