शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळा शहरात केडीएमसीचा हातोडा

By admin | Updated: December 23, 2016 03:06 IST

रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांविरोधातील कल्याण- डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. महापालिकेच्या

टिटवाळा : रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांविरोधातील कल्याण- डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानक ते फाटक आणि वाजपेयी चौक ते नांदप रोडपर्यंत कारवाई केली. मागील १२ वर्षांपासून या रस्त्यांचे काम रखडले होते. या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.टिटवाळ्यात दोन आठवड्यांपासून रस्ता रु ंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात बाधित होणारी घरे, दुकाने, गाळे व इमारती यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. त्यानुसार, मागील आठवड्यात सावरकरनगर ते निमकरनाका या आनंद दिघे मार्गावर कारवाई करण्यात आली. टिटवाळ्यातील समस्या व आरक्षित भूखंडांवर झालेल्या बेकायदा बांधकामांविरोधात येथील प्रभाग क्र मांक १० गणेश मंदिर येथील नगरसेवक संतोष तरे यांनी रवींद्रन यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी बुधवारी टिटवाळ्याचा पाहणी दौरा केला. त्यामुळे बेकायदा बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या दौऱ्यानंतर रवींद्रन यांनी ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनील पाटील यांना बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी सकाळी १० वाजता रेल्वे फाटक ते टिटवाळा रेल्वे स्थानक व वाजपेयी चौक ते नांदप रोड येथे कारवाई करण्यात आली. त्यात ५१ घरे, बैठ्या चाळीतील खोल्या, गाळे, दुकाने, इमारती तोडण्यात आल्या. या वेळी काही प्रमाणात नागरिकांनी कारवाईत अडथळा निर्माण केला. परंतु, त्याला न जुमानता ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली. या कारवाईत भवतारणी इमारतीचे गेट व शेडही पाडण्यात आली. दरम्यान, कारवाईच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, त्यांचे तीन अधिकारी व १०० कर्मचारी तैनात होते. दोन पोकलेन, तीन जेसीबी, चार डम्पर, महापालिकेचे ६९ कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)