शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे आयुक्त शिवसेनाधार्जिणे

By admin | Updated: January 12, 2017 07:10 IST

पूर्वेतील विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त

कल्याण : पूर्वेतील विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रवींद्रन दाद देत नसल्याने महापालिका प्रशासनाविरोधात बुधवारपासून कल्याण पूर्वेचे भाजपासमर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महापालिका आयुक्त हे शिवसेनेचे आहेत. त्यांना शहराच्या इतर समस्या व विकासकामांशी काही देणेघेणे नाही. ते शिवसेनेच्या तालावर नाचणारे आहेत, असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.शिवाजी चौकात ते उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम, शिवसेनेचे संजय मोरे यांनी समर्थन दिले आहे. कल्याण पूर्वेतील स्कायवॉकचे काम पूर्ण झालेले असताना तो नागरिक व प्रवाशांसाठी खुला केला जात नाही. शिवसेनेला त्यांच्या नेत्यांच्या हस्ते तो खुला करायचा आहे. त्यासाठी शिवसेना नागरिक व प्रवाशांना का वेठीस धरीत आहे, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.कल्याण-हाजीमलंग रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याची निविदा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी एका मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळावे, यासाठी या रस्त्याच्या कंत्राटाची निविदा दाबून ठेवली. फेब्रुवारीमध्ये मलंगगडची यात्रा आहे. गडाकडे जाण्यासाठी कल्याण-मलंगगड हाच एकमेव रस्ता असल्याचे ते म्हणाले.दादासाहेब क्रीडांगणात प्रेक्षक गॅलरी तयार करण्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले आहे, त्याला कामांची ३० टक्के रक्कम दिली आहे. कंत्राटदाराने १० टक्केही काम केले नाही. त्याला कामाची रक्कम कशाच्या आधारे दिली, असा प्रश्न गायकवाड यांनी केला आहे. त्याचबरोबर आशेळेगाव व पाडा हा परिसर २७ गावांमध्ये आहे. ही२७ गावे १ जून २०१५ पासून महापालिकेत आहेत. आशेळे गाव व पाड्यात पाणीटंचाई आहे. तेथे गायकवाड यांनी स्वखर्चात जलवाहिनी टाकली. महापालिकेने कारवाईच्या वेळी ही जलवाहिनी तोडली. त्यामुळे तेथे पाणीसमस्या नागरिकांना भेडसावत आहे. कल्याण ते चक्कीनाका रस्ता रुंदीकरणात विठ्ठलवाडी स्थानकानजीकच्या झोपडीधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यास दीड वर्ष उलटून गेले, तरी त्यांना पर्यायी जागा वा पुनर्वसन केलेले नाही. या विविध प्रश्नांवर कोणताही तोडगा काढण्यात आयुक्त असमर्थ ठरले. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्याचे गायकवाड म्हणाले.गायकवाड यांनी यापूर्वी महापालिका मुख्यालयासमोर अशाच प्रकारचे बेमुदत उपोषण सुरू केले होते. तेव्हा तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. बुधवारी गायकवाड यांनी त्याची आठवण सांगत सोनवणे यांनी कामे केली होती, असे सांगितले.