शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीने बेकायदा नळजोडण्या तोडल्या

By admin | Updated: April 1, 2017 23:34 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावांमधील पी अ‍ॅण्ड टी कॉलनी आणि सागावमधील एकूण १५ इमारतींच्या १९ बेकायदा नळजोडण्यांवर शनिवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावांमधील पी अ‍ॅण्ड टी कॉलनी आणि सागावमधील एकूण १५ इमारतींच्या १९ बेकायदा नळजोडण्यांवर शनिवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. त्याचबरोबर पी अ‍ॅण्ड टी मधील बेकायदा बांधकामांवरही हातोडा चालवण्यात आला. केडीएमसीतील २७ गावे ‘ई’ प्रभागांतर्गत येतात. या २७ गावांत बेकायदा बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. या इमारती उभारणारे बिल्डर नागरिकांचे पिण्याचे पाणी पळवून त्याचा वापर बांधकामासाठी करत आहेत, असा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला होता. भाजपा नगरसेविका रवीना माळी यांनी, तर महापालिकेच्या मुख्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढला होता. बेकायदा नळजोडण्यांबरोबर बेकायदा बांधकामांवर महासभेत वारंवार चर्चा झाली होती. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी कडक मोहीम राबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, ई प्रभाग अधिकाऱ्यांनी बेकायदा नळजोडण्या तोडण्याची कारवाई हाती घेतली आहे. प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी पोलीस बंदोबस्तात सागाव गाठले. या पथकाने ‘शिरीन’, ‘पंचवटी’, ‘अंजनी’, ‘श्री बालाजी’, ‘बालाजी प्राइड’, ‘सुनीता अपार्टमेंट’ या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला. काही इमारतींनी मालमत्ताकर थकवला आहे. तर, कारवाई केलेल्या सर्वच इमारतींच्या पाणीजोडण्यांना मोटारी बसवल्या होत्या. या मोटारींद्वारे जास्तीचे पाणी खेचले जात होते. त्यामुळे अधिकृत जोडणी असलेल्या इमारतींचा पाणीपुरवठा अनियमित झाला होता. याची दखल घेत कारवाई पथकाने पाणी खेचणाऱ्या पाच मोटारी जप्त केल्या. खेरानगर, रविकिरण सोसायटी, हनुमान मंदिरामागील परिसरात इमारतींच्या नळजोडण्याही खंडित करण्यात आल्या. उपअभियंता योगेंद्र राठोड, कनिष्ठ अभियंता देवेंद्र एकांडे यांनीही कारवाई केली. ही मोहीम ४ एप्रिलपर्यंत राबवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)