शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कर्नाळा खुणावतोय...

By admin | Updated: January 14, 2017 06:14 IST

कर्नाळाला जायचे तर, सोपा मार्ग म्हणजे पनवेल गाठा. तिथून एसटी स्टॅन्डमधून पेणच्या दिशेने जाणारी कोणतीही लोकल एसटी पकडा.

कर्नाळाला जायचे तर, सोपा मार्ग म्हणजे पनवेल गाठा. तिथून एसटी स्टॅन्डमधून पेणच्या दिशेने जाणारी कोणतीही लोकल एसटी पकडा. रिक्षादेखील उपलब्ध आहेत. गोवा हायवेला अगदी लागून असल्याने कर्नाळाला जाणे सोपे आहे. सगळ्या लोकल बसेस येथे थांबतात. तुमची गाडी, बाईक असेल तर गाडी पार्क करा, सॅक पाठीवर लावा आणि ट्रेकसाठी तय्यार व्हा... कर्नाळा अभयारण्याचा परिसर तसा फार मोठा नाही. जेमतेम साडेचार-पाच चौरस किमी क्षेत्रफळात हे अभयारण्य पसरलेले आहे. ते मुख्यत्वे पक्षी अभयारण्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचे पक्षीनिरीक्षणाचे हे आवडते स्थान होते. रोडपासूनच एक पायवाट जंगलात जाते. या वाटेवरच सुरुवातीला वन खात्याचा एन्ट्री पॉर्इंट आहे. कर्नाळ्याच्या जंगलाला पावसाळ्यानंतर बहार आलेली असते. हिरव्यागार झाडीतून खुणावणारा कर्नाळ्याचा सुळका म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला सुळका आहे. समुद्रसपाटीपासून १५३८ फुटावर असलेला हा सुळका सर करण्यासाठी गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत राहिला आहे. जंगलातील वाटेवर वन खात्याने एक छोटेसे प्राणीसंग्रहालय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जंगल पाहत, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐकत, वाटेत भवानी मातेचे एक छोटेसे मंदिर दिसले की, समजा आपण बरोबर रस्त्याने आहोत. या मंदिरापासून साधारणत: तासाभराचा ट्रेक तुम्हाला कर्नाळा किल्ल्यावर घेऊन जातो. किल्ल्यावर पोचलात की, टिफीन खा.. पाणी प्या.. समोर पसरलेली हिरवीगार झाडी आणि त्यामधून जाणारा गोवा हायवे... उत्तरेकडे दिसणारे पनवेल.. सारं काही बघताना ट्रेकचा शीण जातो. इथे वाटल्यास थोडा आरामदेखील करता येतो. कर्नाळ्याच्या ट्रेकमध्ये माकडांपासून तुमचे सामान सांभाळा. वरती किल्ल्यावर पाहण्यासारखे तसे फारसे काहीच नाही. मात्र हौसेखातर, स्टंटबाजी करायला कर्नाळ्याचा थम्स अप म्हणजे तो सुळका चढायच्या वगैरे भानगडीत पडू नका. हा सुळका सर करायचे तर, अनुभवी गिर्यारोहकच हवा आणि पूर्ण तयारीनिशी येथे यायला लागते. किल्ल्याच्या वरच्या अंगाला मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसतात, त्यामुळे येथे येऊन शेकोटी पेटवणे, जेवण करणे असले प्रकार टाळा.. मधमाशांना डिवचू नका नाहीतर तुमची काही खैर नाही. थोडा आराम झाला, फ्रेश झाला असाल तर, किल्ला उतरायला सुरुवात करायला हरकत नाही. कर्नाळा अभयारण्यातूनच गोवा नॅशनल हायवे जात असल्याने येथे पोचणे सोपे आहे. मात्र जवळपास खाण्यापिण्याची काही सोय नाही. वन खात्याची चौकी व छोटे निवासस्थान येथे आहे. त्याचे बुकींग मात्र ठाणे तीन हात नाका येथील वन खात्याच्या कार्यालयातून करता येते. कर्नाळयाचा ट्रेक तसा नवशिक्या हौशी ट्रेकर्सनादेखील सोपा आहे. अगदीच ट्रेकचा कंटाळा आला तर, जंगल दर्शन करून फ्रेश होऊन परतता येईल. मात्र येथे येताना पाणी व भरपूर टिफीन सोबत ठेवा. सायंकाळी ६ नंतर अभयारण्यातील प्रवेश बंद होतो. पक्षी निरीक्षणासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा मोसम ठिक असतो.  - शशिकांत कोठेकर