शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कपिल पाटील यांच्या मतांमध्ये ४६ हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:16 IST

लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते.

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. काही विरोधकांनी पाटील यांच्या गावाजवळील काही ठिकाणी विरोधाचे वातावरण निर्माण केले, तर काहींनी बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे शहरासह तालुका ढवळून निघाला. हे लोण संपूर्ण मतदारसंघात पसरल्याने या निवडणुकीला खरी रंगत आली होती. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी काँग्रेसमध्येही उमेदवारी मिळवण्यापासून स्पर्धा झाली. या स्पर्धकांनी दिल्ली गाठून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या पक्षातही पालिकेतील काही नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले. मागील निवडणुकीतील उमेदवार विश्वनाथ पाटील यांना काँग्रेस वरिष्ठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. मात्र, ही वाट धरताना कुणबी समाजासाठी मागण्या करून आश्वासन पदरात पाडून घेतले. परिणामी, काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा एक लाख नऊ हजार मतांनी पराभव करून भाजपचे पाटील निवडून आले होते. आता काँग्रेस उमेदवार टावरे यांचा पराभव करून पाटील हे एक लाख ५५ हजार मतांनी निवडून आले. मागील निवडणुकीत मतदारांची संख्या १६ लाख होती. ती या निवडणुकीत १८ लाख झाली. दोन लाख नवीन मतदार निर्माण झाले. दीड लाखाने मतदान वाढले होते. या दीड लाखापैकी एक लाख १२ हजार मते पाटील यांना वाढलेली दिसून येतात. टावरे यांना ६५ हजार मते वाढली. वास्तविक, हा मतदार या निवडणुकीचा निर्णायक घटक ठरला आहे.भिवंडी हे मुस्लिमबहुल असल्याने या ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम या दोन मतदारसंघांतून काँग्रेसला अपेक्षित मतदान झाले नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला भिवंडी पूर्वमध्ये ५९ हजार ३९४, तर यावेळी ७० हजार ८२५ मतदान झाले. भिवंडी पश्चिममध्ये ६१ हजार ८९५ मतदान झाले होते. यावेळी ७८ हजार ३७६ मतदान झाले. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने २७०० मते, तर वंचित बहुजन आघाडीला ५१ हजारांची मते मिळाल्याने मतांचे काही प्रमाणात विभाजन झाले.विशेष म्हणजे पाटील यांच्याविरोधात काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या बंडाचा फायदा आपल्याला होईल, या अपेक्षेमध्ये असलेल्या टावरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली.>भिवंडी लोकसभा २०१४मतदारसंघ भाजप काँग्रेसभिवंडी ग्रामीण ८५,५४२ ४२,४७३शहापूर ५३,२७० ४९,८०९भिवंडी पश्चिम ४२,३९८ ६१,८९५भिवंडी पूर्व ४०,१०३ ५९,३९४कल्याण पश्चिम ९७,०१७ ३५,६३५मुरबाड ९२,४२२ ५२,२४६>भिवंडी लोकसभा २०१९मतदारसंघ भाजप काँग्रेसभिवंडी ग्रामीण १,१५,५६१ ५३,६६९शहापूर ६७,९०७ ५३,५२०भिवंडी पश्चिम ५२,८५६ ७८,३७६भिवंडी पूर्व ४७,०१८ ७०,८२५कल्याण पश्चिम १,१७,४४० ४९,३०५मुरबाड १,२५,२५० ६०,८९६>भिवंडी लोकसभा मतदारसंघातीलमतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा एक लाख ५५ हजारांनी विजय झाला आणि काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव झाला. मोदीलाट नसताना हा विजय झाला, तरी या निवडणुकीवर मोदींचा प्रभाव असल्याचे नाकारून चालणार नाही. गेल्या निवडणुकीत मोदीलाटेत पाटील हे एक लाख नऊ मतांनी निवडून आले होते. त्यामध्ये ४६ हजारांची वाढ झाली.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019