शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, डोंबिवली, दिव्यात वीज सक्षमीकरण

By admin | Updated: July 11, 2016 02:05 IST

कल्याण-डोंबिवली आणि दिवा भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी या भागात १०० कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली

ठाणे : कल्याण-डोंबिवली आणि दिवा भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी या भागात १०० कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ कोटी उपलब्ध करून देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.ग्रामीण भागांमध्ये पथदिव्यांच्या बिलांचा भार शासनाने उचलावा, असा जीआर असताना अंबरनाथ आणि कल्याणच्या ग्रामीण भागांमध्ये पथदिव्यांची जोडणी कापण्यात आल्याचे शिंदे यांनी या वेळी निदर्शनास आणले. ज्या ठिकाणी पथदिव्यांची आवश्यकता आहे, तिथे तातडीने ते उभारण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. दिव्यामध्ये ४५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ठाण्यापुढील या संपूर्ण परिसरातील वीजसमस्या सोडवण्यासाठी ७ जुलै रोजी कल्याण येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना दिले. अंबरनाथ येथील पाले विद्युत उपकेंद्राकरिता एमआयडीसीकडून जीआयएस योजनेंतर्गत ६ हेक्टर जागा तातडीने हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असून उल्हासनगर येथील लाललोई स्विचिंग स्टेशनकरिता ऊर्जा विभागाच्या नवीन धोरणानुसार आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बावनकुळे यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांना दिले. दिवा येथे स्विचिंग स्टेशनची आवश्यकता असल्याने ठाणे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ते बांधण्याची तयारी ऊर्जामंत्र्यांनी दाखवली. तसेच, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन खारेगाव येथे स्वतंत्र विभाग करण्यासही त्यांनी तत्त्वत: मंजुरी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. दिव्यासाठी स्वतंत्र उपविभाग निर्माण करण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)