शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण खाडी विकास एप्रिल अखेरपर्यंत

By admin | Updated: March 30, 2017 04:04 IST

महाराष्ट्र मेरीटाइम बोडामार्फत ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील गणेशघाट ते वाडेघरपर्यंतच्या खाडी किनाऱ्याला

मुंबई : महाराष्ट्र मेरीटाइम बोडामार्फत ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील गणेशघाट ते वाडेघरपर्यंतच्या खाडी किनाऱ्याला संरक्षण भिंत, जेट्टी व पोहोचरस्ता तयार करण्याचे काम एप्रिल २०१७ अखेर पूर्ण करण्यात येईल, असे बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला लागून असलेल्या खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केला होता. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत गणेशघाट ते वाडेघरपर्यंत संरक्षण भिंत, जेट्टी व पोहोचरस्ता तयार करण्यासाठी ४५० मीटरपर्यंत काम सुरू करण्यात आले असून, ते येत्या एप्रिलअखेर पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी एकूण ४ कोटी ९६ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, सदर अंतर ८ किमी आहे. आतापर्यंत ३००हून अधिक मीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीने निधी दिला आहे. आगामी काळात युनिफाईड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्यासाठी आठ ठिकाणचा अभ्यास करण्यात येत असून, यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.मोनो रेलची भाडेवाढ नाही मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी अनंत गाडगीळ यांच्या इतर एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रेल्वे आणि मेट्रो रेल्वे याबरोबरच मुंबईकरांना प्रवासासाठी मोनो रेल सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सध्या मोनो रेलच्या सुरक्षेसाठी २० ते २५ टर्क्क खर्च करण्यात येत आहे. मोने रेलचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. पण, त्यामुळे मोनो रेलचे भाडे वाढविले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)