शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कासव, स्पीनर, व्हॉटसअ‍ॅपच्या राख्यांनी बाजारात आणली बहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:39 IST

जीएसटीमुळे राख्यांचेही दर वाढतील या भीतीने यंदाच्या रक्षाबंधनासाठी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात राख्या ठाण्याच्या बाजारात आल्या आहेत.

प्रज्ञा म्हात्रे ।ठाणे : जीएसटीमुळे राख्यांचेही दर वाढतील या भीतीने यंदाच्या रक्षाबंधनासाठी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात राख्या ठाण्याच्या बाजारात आल्या आहेत. कासव, स्पीनर, व्हॉटस अ‍ॅप अशा राख्यांनी यंदा वेगळेपण ंआणले असले तरी त्यापेक्षा फार वेगळी व्हरायटी यंदा पाहायला मिळत नाही. जीएसटीमुळे असेल पण यंदा दरात वाढही झालेली नाही आणि घटही झालेली नाही, असे दुकानमालकांनी सांगितले.रक्षाबंधनाचा सण आठवडाभरात येऊन ठेपला. त्यानिमित्त गेल्या आठवडाभरात नानारंगी राख्या बाजारात आल्या असल्या तरी या राख्यांमध्ये दरवर्षी दिसून येणारे नाविन्यपूर्ण प्रकार यंदा मोजकेच असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या मताला दुकान मालकांनीही दुजोरा दिला आहे. जीएसटीच्या भीतीने यंदा जास्त राख्या विक्रीसाठी आणल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.परदेशात राख्या पाठवाव्या लागत असल्यामुळे महिनाभर आधीच राख्यांची खरेदी दुकानमालक करीत असतात. राख्यांवरही जीएसटी लागू होते की काय आणि किती याबाबत आम्ही गोंधळलो होतो म्हणून यंदा २० ते ३० टक्केच माल आणला आणि त्यातही फारसे नवे प्रकार नसल्याचे दुकान मालक सुशील गाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राख्यांवर जीएसटी नसल्याचे नंतर समजले. परंतु आता नवीन राख्या आणणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा राख्यांचे दर वाढलेले नाहीत आणि कमीही झाले नाही असे विक्रेत्यांनी सांगितले.मोठ्यांसाठी कासवाची राखी, बच्चे कंपनीसाठी स्पीनर राखी आणि तरुणाईला आकर्षित करणारी व्हॉट्सअ‍ॅप राखी या नव्याने पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राख्यांमध्ये मीनाकारी, वुडनमध्ये कार्व्हिंग राखी- त्यात ओम, गणपती, जरदोसी, मोती, रुद्राक्ष, इव्हील आय, डायमण्ड, गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमण्डची राखी, सिल्व्हर प्लेटेड, गोल्ड प्लेटेड विथ चंदन, डायमण्डमध्ये ओमची राखी, ब्रेस्लेटमध्ये ओम, रुद्राक्ष राखी, क्रिस्टल रुद्राक्ष राखी या प्रकारांच्या राख्या बाजारात आल्या असून याची किंमत १० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहे.