शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

हास्यप्रेमींनी लुटला खळाळता आनंद

By admin | Updated: May 8, 2017 06:10 IST

गाणे, नाचणे, लहान मुलांसारखे टाळ्या वाजवणे असे करतकरत खळाळून हसत, सात मजली हास्याची धबधबा सोडत ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गाणे, नाचणे, लहान मुलांसारखे टाळ्या वाजवणे असे करतकरत खळाळून हसत, सात मजली हास्याची धबधबा सोडत ठाण्यात रविवारी जागतिक हास्यदिन साजरा झाला. यावेळी हास्यप्रेमींनी विविध हास्यप्रकार सादर केले आणि तणावमुक्तीसाठी खळखळून हसण्याचा आनंद लुटला. कचराळी तलाव येथे जागतिक हास्यदिनानिमित्त २० हास्यक्लब एकत्र आले होते. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. ४० वर्षे ते ८० वर्षे वयोगटातील जवळपास ३०० हून अधिक हास्यप्रेमी यावेळी उपस्थित होते. दरवर्षी सोहळ््याच्या आयोजनाची जबाबदारी एका क्लबवर असते. यंदा ही जबाबदारी प्रज्ञा हास्यक्लब, हिरानंदानी मेडोज यांनी पार पाडली. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. माधवी कयाळ यांनी स्वागत करताच मुख्य सोहळ््याला सुरूवात झाली. हास्यक्लबचे सर्वेसर्वा डॉ. मदन कटारिया यांचा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. १०६ देशांत झालेला हास्ययोगाचा प्रचार, त्यातून हास्यकुटुंबांची निर्मिती यांचा उल्लेख या संदेशात होता. जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा तुम्ही बदलाल आणि जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हा तुमच्या भोवतालचे जग बदलेल, हे त्यांचे घोषवाक्य वाचून दाखविण्यात आले. हसण्याचे शरीराला होणारे फायदे सांगत एबीसी लाफ्टर योगा क्लबचे संस्थापक डॉ. माधव म्हस्के यांनी संपूर्ण शहर हसरे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.