शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ज्युपिटरला आता हव्यात वाहन सुविधा!    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:34 IST

जिल्हह्यातील सुमारे २०० कुपोषित बालके दत्तक घेण्याचे आश्वासन  येथील प्रसिध्द ज्युपीटर रूग्णालयाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले.

ठाणे : जिल्हह्यातील सुमारे २०० कुपोषित बालके दत्तक घेण्याचे आश्वासन  येथील प्रसिध्द ज्युपीटर रूग्णालयाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले. परंतु बरेच महिने उलटल्यानंतरही या रूग्णालयाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाही. डॉक्टराना ठिकठिकाणी जाण्यासाठी  वाहने व आवश्यक त्या सोयी सुविधांची मागणी करून या रूग्णालयाकडून बालके दत्तक घेण्याचे टाळाटाळ केले जात असल्याचे आरोग्य यंत्रणेने जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिले.कुपोषित बालकाना सशक्त करून कुपोषणाचा कलंक मिटवण्यासाठी आश्वासनांची खैरात ज्युपीटर रूग्णालयाने केल्याचे जिल्हाधिकाºयांनी गाभा समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. पण त्यानुसार अद्याप काही ही केले नसल्याचे निदर्शनात येताच जिल्हाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना म्हणावे माझी गाडी न्या..., हवेतर लाल दिवा लावून देतो... त्यातून आदिवासी दुर्गम भागात जावून तज्ज्ञ डॉक्टरांकडून कुपोषित बालकांची आरोग्य   तपासणी करा...  हे सिरिअसली आहे... खोटे नाही... असे स्पष्ट करून जिल्हाधिकाºयांनी ज्युपीटरशी त्वरीत संपर्क साधण्याची जबाबदार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील व भिवंडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धानके मॅडम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यात खरे तर १०४ बालके कुपोषित आहेत. पण ज्युपीटरने २०० बालके स्वखर्चातून दत्तक घेण्याचा पुढाकार व्यक्त केला आहे. त्यास काही महिने उलटलेले आहे. तरी देखील या रूग्णालयाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाही. त्यांनी शब्द दिल्या प्रमाणे आरोग्य यंत्रणेने त्यांच्याशी सतत संपर्कही केला. पण रूग्णालयाकडून हालचाली झाल्या नाही. अखेर दुर्गम भागात जाणाºया डॉक्टरांना  ने - आण करण्यासाठी गाड्या व सोयी सुविधांची अपेक्षा या रूग्णालय व्यवस्थापनाने केल्याचे उघड झाले.