शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘जागृती’, ‘शिवनेरी’च्या मूर्ती ठरल्या सर्वोकृष्ट

By admin | Updated: September 14, 2016 04:22 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश दर्शन’ स्पर्धेत कल्याण बेतुरकरपाडा येथील ‘जागृती गणेशोत्सव मंडळ’ आणि डोंबिवलीतील ‘शिवनेरी मित्र मंडळा’च्या

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश दर्शन’ स्पर्धेत कल्याण बेतुरकरपाडा येथील ‘जागृती गणेशोत्सव मंडळ’ आणि डोंबिवलीतील ‘शिवनेरी मित्र मंडळा’च्या मूर्तींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. तसेच सजावटीकरिता कल्याण पश्चिमेकडील ‘विजय तरूण मंडळ’ आणि डोंबिवली पूर्वेतील ‘स्रेहांकित मित्र मंडळा’ला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. गणेश दर्शन स्पर्धेत ४९ मंडळांनी सहभाग नोंदविला होता. गणेश मूर्ती आणि सजावट या दोन निकषांवर निवड करण्यात आली. गणेशमूर्ती करीता दिलेल्या पारितोषिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी कल्याणमधून ‘दूधनाका गणेशप्रेमी मंडळ’ तर डोंबिवलीतून ‘जोशी मित्र मंडळ’ यांची निवड झाली. कल्याण बाजारपेठ परिसरातील ‘श्री विष्णू मंदिर गणेशोत्सव’ तर डोंबिवलीमधील ‘गोग्रासवाडी गणेशोत्सव मंडळ’ यांच्या मूर्तींना तिसरा क्रमांक मिळाला आहे. ‘बालवीर मित्र मंडळ’ आणि ‘प्रबोधन मित्र मंडळ’ या कल्याणमधील तर डोंबिवलीतील ‘बाळ गोपाळ मंडळ’ आणि ‘शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळां’च्या मूर्तींना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.सजावटीसाठी ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘पर्यावरण’ हे विषय महापालिकेने दिले होते. यात द्वितीय क्रमांक कल्याणच्या सुभाष चौकातील ‘मुरारबाग मित्र मंडळ’ आणि डोंबिवली पश्चिमेतील ‘अष्टविनायक मित्र मंडळा’ने पटकाविला आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कल्याणच्या लेले आळीतील ‘श्री गणेशोत्सव मित्र मंडळ’ तर डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानाच्या ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला जाहीर झाले आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिकाने कल्याण पूर्वेतील ‘विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’, पश्चिमेतील ‘श्री स्पोर्टस क्लब गणेशोत्सव मंडळ’ तर डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली रोडवरील ‘एकता मित्र मंडळ’ आणि राजाजी पथावरील ‘राजाजी पथ गणेशोत्सव मंडळा’ला गौरविण्यात येणार आहे. महापौरांचे विशेष पारितोषिक कल्याण पूर्वेकडील ‘नवयुग मित्र मंडळा’ला जाहीर झाले आहे. या स्पर्धसाठी वैशाली कांदळगांवकर, मिनल लेले, ललित किरंगे, व्यंगचित्रकार गणेश जोशी यांनी परीक्षक तर संयोजक म्हणून भिकू बारस्कर यांनी काम पाहिले.