शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची पदे रद्द करणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:48 IST

भाजप आमदार : ...मग हरकती, सूचना मागवल्या कशासाठी?

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतील १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आयुक्तांचा निर्णय चुकीचा आहे. महापालिकेतून सर्वच्या सर्व २७ गावे वगळण्याची मागणी असताना केवळ १८ गावे वगळली आहेत. हरकती, सूचना मागविल्या असताना घाईघाईत राज्य सरकारने गावे वगळण्याचा निर्णय का घेतला? सरकारला मनमानी करून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवायची आहे का? मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याने आम्हा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता असे निर्णय तातडीने घेतले जात आहेत, असा हल्लाबोल कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.केडीएमसीतून २७ पैकी १८ गावे वगळण्यात आल्याने या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे परिपत्रक संबंधित नगरसेवकांना पाठवले आहे. त्यामुळे गायकवाड यांनी नाराजी व्यक्तकेली आहे.जूनमध्ये २७ गावांसंदर्भात हरकती, सूचना मागवल्या होत्या. जी नऊ गावे महापालिकेत ठेवली आहेत, त्याला स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्रांचा विरोध आहे. २७ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन व्हावी, अशी सर्वांची मागणी आहे. त्यामुळे याबाबत अनेकांनी हरकती, सूचना नोंदविल्या आहेत. स्थानिक आमदार म्हणून मी देखील हरकत आणि सूचना मांडली आहे. परंतु, त्यावर कोणतीही सुनावणी न होताच ही गावे वगळण्याची कृती राज्य सरकारने केली आहे. जर गावे वगळायचीच होती तर हरकती, सूचना का मागविल्या, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.नऊ गावे महापालिकेत ठेवण्यासंदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. राज्य सरकाने एकप्रकारे मनमानी चालविली असून यात भूमिपुत्रांवर मोठा अन्याय होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.महापालिकेच्या हद्दीतील जी १८ गावे वगळली, त्या गावांमधील नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. कायद्यातील तरतुदीप्रमाणे नगरसेवकपदासाठी नाव मतदारयादीत असले पाहिजे. परंतु, कार्यक्षेत्रातून ती गावे बाहेर गेल्याने संबंधित नगरसेवक प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे पद रद्द केले आहे. सध्या तरी १८ गावांमध्ये महापालिका सेवा देत आहे. ज्यावेळेला त्या गावांमध्ये नगर परिषद स्थापन होईल, तेव्हा राज्य सरकार ज्या सूचना करेल, त्याप्रमाणे कार्यवाही होईल.- डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका