शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी स्टॅन्डच्या कचराकुंड्या

By admin | Updated: October 12, 2016 04:04 IST

चोरीला जाणाऱ्या स्टीलच्या (टाक्या) थुंकी तथा कचरा कुंड्यांचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात लोखंडी स्टॅन्डच्या कचरा कुंड्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : चोरीला जाणाऱ्या स्टीलच्या (टाक्या) थुंकी तथा कचरा कुंड्यांचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात लोखंडी स्टॅन्डच्या कचरा कुंड्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवताना, २५ स्टॅन्ड तयार करुन ते बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. या परिसरातून दररोज लाखो प्रवासी येजा करतात. तसेच या स्थानकाला प्राप्त झालेल्या दर्जानुसार त्याच्या सुरक्षेसह येथील स्वच्छतादेखील तितक्याच महत्त्वाचा विषय आहे. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कचरा टाकण्यासाठी तसेच थुंकण्यासाठी फलाट क्र मांक १ ते फलाट क्र मांक १० या स्थानकांवर तब्ब्ल ३५ ते ४० स्टीलच्या टाक्या रेल्वे प्रशासनामार्फत बसविल्या आहेत. मात्र, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील आवारात वावरणारे गर्दुल्ले हे रात्रीच्या वेळी चोरून घेऊन जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मागील एक- दोन वर्षात अंदाजे ३५ टाक्या चोरीला गेल्या आहेत. त्यालाच पर्याय म्हणून ठाणे रेल्वे प्रशासनाने ही पाऊले उचलण्यास सुरु वात केली आहे. त्यानुसार, लोखंडी स्टॅन्ड असलेल्या कचऱ्याच्या कुंड्या बसविण्याचा निर्णय घेऊन प्रायोगिक तत्वावर २५ लोखंडी स्टॅन्ड तयार केले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाप्रकारे १०० स्टॅन्ड बसवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.