शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीमुळे अंतर्गत गटबाजी

By admin | Updated: August 20, 2016 04:49 IST

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आणखी काही महिने शिल्लक असतानाच आता दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजीचे राजकारण

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आणखी काही महिने शिल्लक असतानाच आता दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. रिपाइं आठवले गटाचे शहर अध्यक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला असतांनाच त्यांच्या निरीक्षकांनी मात्र तो भाजपाला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निमित्ताने रिपाइंमध्ये दोन गट पडले असून शिवसेना आणि भाजपाला याचा कितपत फायदा होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने पुन्हा शिवसेनेवर तोंडसुख घेतले आहे. शिवसेनेनेच दिलेला शब्द न पाळल्याने,आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. प्रभाग क्र. ३२ अ आणि ५३ अ मध्ये सध्या पोटनिवडणूक लागली असून या दोन्ही निवडणुका आता शिवसेना आणि भाजपाने चांगल्याच मनावर घेतल्या आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे विटाव्याची जागा ही भाजपाच्या वाटेला जाणे अपेक्षित होते. त्यानुसार ती जागा शिवसेनेकडे मागितली होती, अशी माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली. परंतु, शिवसेनेने पुन्हा या ठिकाणी एका हत्येप्रकरणातील आरोपी असलेल्या माजी नगरसेवकाच्याच घरातील नातेवाईकाला तिकीट दिल्याने आम्ही त्याठिकाणी उमेदवार दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने रिपाइं आठवले गटाने या निवडणुकीसाठी भाजपाला जाहीर पाठिंबा दर्शविल्याचे जाहीर केले. तो देतांनाच जर कोणी वैयक्तीक पाठिंबा इतर ती त्याची एकट्याची भूमिका असेल असा अप्रत्यक्ष टोला पक्षाचे ठाणे शहर जिल्हा निरिक्षक प्रा. एकनाथ जाधव यांनी शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे यांना लगावला. किंबहुना या संदर्भात त्यांना छेडले असता, त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपा हे आमने सामने आले असले तरी दुसरीकडे रिपाइंच्यामध्येही दोन पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी ठामपा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांच्यावर यापूर्वीच पक्षाने कारवाई करुन त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांनी जे लेटरहेड वापरलेले आहे, तेदेखील बोगस आहे.- रामभाऊ तायडे, रिपाइं आठवले गट, ठाणे शहर अध्यक्ष.