शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शासकीय कार्यालयांचा होणार एकात्मिक पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

ठाणे : ठाणे स्टेशन रोड परिसरात सुमारे १०० वर्षे जुन्या इमारतींमध्ये विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करून त्यांना एकाच ...

ठाणे : ठाणे स्टेशन रोड परिसरात सुमारे १०० वर्षे जुन्या इमारतींमध्ये विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करून त्यांना एकाच छताखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकार घेत असून, त्याचे सविस्तर सादरीकरण मंगळवारी मंत्रालयात झाले. ठाणे महापालिकेकडे या प्रकल्पासाठी एक महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठाणे स्टेशन रोड परिसरात तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, जुनी ठाणे महानगरपालिका इमारत, जिल्हा परिषदेची कन्याशाळा, अशा काही इमारती उभ्या आहेत; मात्र सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या या इमारती आता अत्यंत जीर्ण झाल्याने त्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे. या इमारतींच्या जागी अत्याधुनिक पद्धतीची सरकारी कार्यालये व्हावीत, यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. यामुळे वेगाने हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेला दिले.

आयकॉनिक इमारतीत मिळणार दुप्पट जागा

या भागातील सर्व कार्यालयांना एकाच इमारतीत सामावून घेतले जाणार आहे. या जागी बहुमजली आयकॉनिक इमारत उभी राहणार असून, या इमारतीत सद्यस्थितीत वापरत असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा या कार्यालयांना मिळणार आहे. याशिवाय सर्वसामान्य लोकांना आणि इमारतीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खासगी कार्यालयांना मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय या इमारतीच्या बाजूलाच शाळेसाठी स्वतंत्र इमारत आणि मैदान बांधून देण्यात येणार आहे. तसेच, काही छोटी खासगी कार्यालये आणि पालिका बाजार सुरू करण्यासाठी काही गाळे उपलब्ध होणार आहेत.

..............

मंगळवारी झालेल्या या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.