शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कॅथॉलिकच्या गाळाखरेदीची चौकशी

By admin | Updated: May 24, 2017 00:55 IST

बॅसीन कॅथॉलिक बँकेने सातिवली येथे खरेदी केलेल्या गाळ््याच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : बॅसीन कॅथॉलिक बँकेने सातिवली येथे खरेदी केलेल्या गाळ््याच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी मुंबईच्या अपर विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बॅसीन कॅथॉलिक बँकेने सातीवली शाखेसाठी घेतलेल्या जागेसंदर्भात बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार अ‍ॅड. जिमी घोन्सालवीस यांनी पुण्याचे सहकार आयुक्त डॉ. जे. डी. पाटील यांच्याकडे केली आहे. घोन्सालवीस यांच्या तक्रारीनंतर नागरी बँक कार्यासनाने या बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कल ८१ (३) (क) अन्वये चाचणी लेखापरिक्षण करणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी नोंदवले आहे. बँकेच्या परिशिष्ट अ मध्ये निर्धारित केलेल्या मुद्यांचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अपर विशेष लेखापरिक्षक एस. एस. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बँकेच्या परिशिष्ट अ मधील मुद्यांना अनुसरून बँकेच्या निधीचा दुरुपयोग, गैरव्यवहार, अपहार व तदअनुषंगाने बँकेचे आर्थिक नुकसान झाले किंवा कसे याबाबत चाचणी लेखापरीक्षण करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत.