शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नवख्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: June 13, 2017 03:16 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर अनेकांना निवडणूक लढवण्याचे डोहाळे लागले आहेत. स्थानिक, विभागीय तसेच राष्ट्रीय पक्षांची

राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर अनेकांना निवडणूक लढवण्याचे डोहाळे लागले आहेत. स्थानिक, विभागीय तसेच राष्ट्रीय पक्षांची शहरात नांदी असताना त्यात नवख्या पक्षांची भर पडू लागली आहे. निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू करून समितीचीदेखील स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये दरवेळच्या पालिका निवडणुकीसाठी स्थानिक राजकीय पक्ष वगळता इतर पक्षांचा भडिमार सुरू होत असतो. अनेकदा असे पक्ष निवडणुकीत तग धरू शकत नसले, तरी ते एका हेतूने प्रेरित होऊन निवडणूक लढवतात. कालांतराने मात्र काही नवख्या पक्षांची नोंदणीदेखील रद्द केली जाते. यंदाही पालिका निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना काही मंडळी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून निवडणुकीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. तर, शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेने यंदाच्या निवडणुकीत पदार्पण करण्याच्यादृष्टीने सुकाणू समितीची स्थापनाही केली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेने अनेक ठिकाणच्या निवडणुका लढवल्याचा दावा केला जात आहे. अलीकडे ठाणे पालिका निवडणुकीतही परिषदेने चांगले यश मिळवल्याचा दावा करत पुढील सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार परिषदेकडून केला जात आहे. पक्षवाढीसाठी परिषदेत इनकमिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात, राष्ट्रवादीसह इतर पक्षांतील इच्छुकांनी उड्या घेतल्या आहेत. परिषदेने आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली, तरी त्याला शहरात पूरक वातावरण मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. परंतु, पक्षाचा जोरदार प्रचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील प्रत्येकावर परिषदेने जबाबदारी सोपवली आहे. परिषदेच्या संभाव्य यशासाठी शहराच्या विकासाचा अजेंडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परिषदेप्रमाणेच आणखी काही पक्ष वा संघटना येत्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. यामुळे मतविभागणीला बळ मिळत असल्याने मतदानाचा ठोस परिणाम हाती लागत नसल्याची खंत काही स्थानिक राजकीय मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. याप्रमाणे काही स्थानिक सामाजिक संघटनादेखील निवडणुकीत उतरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात शहरातील निर्भय भारत सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संजीव नाईक यांचे समर्थक यांनी सर्वपक्षीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याची तयारी चालवली आहे. तशी संघटनेची अधिकृत नोंदणीदेखील करण्यात आली आहे. यंदा पालिका निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.