शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

फायर एनओसीसाठी अडवणूक

By admin | Updated: February 21, 2017 05:41 IST

फायर एनओसीत अडवणूक होत असल्याने रुग्णालय चालविणारे डॉक्टर पालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत

बदलापूर : फायर एनओसीत अडवणूक होत असल्याने रुग्णालय चालविणारे डॉक्टर पालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. रूग्णालयांच्या परवान्यांचे वेळेत नूतनीकरण न झाल्यास शहरातील रूग्णसेवाच ठप्प होईल, असा इशारा डॉक्टरांनी दिल्याने हे प्रकरण आता चिघळले आहे. रूग्णसेवा कोलमडली, तर त्याचा फटका आजारी व्यक्ती, गरोदर महिलांना बसू शकतो. ही परिस्थिती लक्षात येताच सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकानेच पालिकेकडे तक्रार केली असून डॉक्टरांची अडवणूक न करण्याची मागणी केली आहे. सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना फायरची एनओसी (अग्नीशमन प्रतिबंधक उपायांसंदर्भात ना हरकत) बंधनकारक आहे. त्यासाठी जाणाऱ्या डॉक्टरांच्या अडवणुकीचे काम पालिकेमार्फत केले जाते. नियमानुसार रुग्णालय चालविण्यात येत असूनही कोडी करण्याचे काम फायर विभागामार्फत केले जाते, तसेच एनओसी सहज मिळेल याकडे लक्ष न देता ती त्रासदायक कशी होईल, याचाच विचार पालिकेमार्फत केला जात असल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे.बदलापूर शहरात अनेक रुग्णालये अनेक वर्षापासून इमारतींत किंवा गाळयांतून रूग्णसुविधा पुरवतात. या सर्व दवाखाने आणि रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण दरवर्षी जिल्हा सिव्हिल सर्जनमार्फत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची ना हरकत लागते. लहान रुग्णालयात अग्नीशमन प्रतिबंधक उपाययोजना आखूनही अग्निशमन विभागाची आणि त्याला जोडून पालिकेची रितसर एनओसी दिली जात नाही. काही लहान दवाखान्यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांना लागलीच एनओसी देणे पालिकेची जबाबदारी आहे. मात्र त्यांना सल्ला आणि सहकार्य करण्याऐवजी त्यांच्या अडवणुकीचेच काम केले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदलापुरातील बहुतांशी रुग्णालये आणि मॅटर्निटी होमच्या परवान्याचे नूतनीकरण रखडले आहे. ते न झाल्यास त्यांना दवाखाने, रुग्णालये आणि मॅर्टिनटी होम बंद करावे लागणार आहेत. त्याचा परिणाम शहरातील रु ग्णसेवेवर होऊ शकतो. गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्तींना त्याचा फटका बसू शकतो. नव्या इमारतींना सुरक्षेची साधने उपलब्ध होत आहेत. मात्र जुन्या इमारतीत सुरु असलेल्या रुग्णालयांना नव्याने यंत्रणा उभारणे भाग पडत आहे. डॉक्टर तशी यंत्रणा उभारत असूनही त्यांना एनओसी देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन पालिकेने नियम सुटसुटीत करत फायर एनओसीबाबत उपाय योजावेत, अशी मागणी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो झाला नाही. (प्रतिनिधी)हॉटेलांना वेगळा न्यायच्फायर एनओसीसाठी डॉक्टरांना कोंडीत पकडण्याऱ्या अग्निशमन विभागाने अनधिकृत हॉटेल आणि हॉटेलचे शेड उभारलेल्या बड्या हॉटेल मालकांना मात्र कोणतीही पाहणी न करताच एनओसी देण्याचे काम केले आहे. च्अनेक हॉटेलमध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसतांनाही त्यांना अशी एनओसी दिली जात आहे. सुरक्षेची साधने नसतांनाही हॉटेलचालकांना आणि मालकांना उघडपणे एनओसी देणारे पालिका प्रशासन रुग्णालयांना मात्र कोंडीत पकडण्याचे काम करत आहे, हा मुख्य आक्षेप आहे.पालिकेच्या मनमानी कारभाराबद्दल अनेक डॉक्टरांची माझ्याकडे तक्रार आली आहे. त्या तक्रारींच्या आधारे मी प्रशासनाला पत्र देऊन रुग्णालयांना फायर एनओसी देण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. तरीही प्रशासन काम करत नसेल तर आम्ही आंदोलन करू.- शैलेश वडनेरे, माजी सभापती आणि नगरसेवकचिरीमिरी न देणाऱ्यांची कोंडीच्सध्या ५५ हून अधिक लहान-मोठी रुग्णालये-दवाखाने शहरात सुरु आहेत. नव्याने रुग्णालयांची कामे सुरु आहेत. या रुग्णालयांना नियमित कामकाज करण्यासाठी पालिकेची एनओसी बंधनकारक केली आहे. च्ती न मिळाल्यास परवाना नूतनीकरणास विलंब लागतो आहे. त्यामुळे काही डॉक्टर आर्थिक व्यवहार करुन एनओसी मिळवित आहेत. काही डॉक्टरांना हा मार्ग अवलंबणे शक्य होत नाही. त्यांची कोंडी होते आहे, असा त्यांचा दावा आहे.