शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला

By अजित मांडके | Updated: April 30, 2025 15:25 IST

मी मुख्यमंत्री असतानाही पंढरपुरात चार वेळा पूजा केली होती असं शरद पवार यांनी म्हटलं.

ठाणे : काही लोक असे म्हणतात की मी अशा कार्यक्रमाला जात नाही. परंतु ते अर्ध सत्य आहे. त्यांना आज कदाचित उत्तर मिळाले असेल. मी लहान असल्यापासून कित्येक पूजा केलेल्या आहेत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या मनसेचे राज ठाकरे यांना टोला लगावला. मी मुख्यमंत्री असतानाही पंढरपुरात चार वेळा पूजा केली असल्याचही त्यांनी सांगितले.

पाचपाखाडी भागात उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहरातील शेकडो लोकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. 

मी आज मोठ्या श्रध्देने सहपरिवार पूजा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पवित्र कामात राजकीय प्रश्न आणू नका अशी विनंतही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चेविषयी पवार यांना छेडले असता, दोन कुटुंब एकत्र आली तर आम्हाला आनंदच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहलमगावर झालेल्या हल्याच्या अनुषगांने टीका केली गेली आहे. परंतु हा टीकेचा विषय आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पहलगाम हल्यानंतर आता विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी काँग्रेसने केली असून त्याला आमचा पाठींबा असल्याचे सांगत लवकरात लवकर हे अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी सांगितले. तसेच जो हल्ला झालेला त्यानंतर आता पाकीस्तानला उत्तर देणे गरजेचे असून पंतप्रधान जे निर्णय घेतील त्या सोबत आम्ही असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा हल्ला केवळ त्या लोकांवर नाही तर हा देशावरील हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारthaneठाणे