शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीधारकांचा पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: May 6, 2017 05:45 IST

भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. पालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यात काशीगाव येथील दाचकुलपाडा, मीनाक्षीनगर, माशाचापाडा आदी भागांतील बेकायदा झोपड्यांचा समावेश आहे. या झोपड्या काही स्थानिक राजकीय मंडळींकडूनच वसवण्यात येत असल्याने पालिकेतील काही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. काही वर्षांपूर्वी याच परिसरातील हजारो बेकायदा झोपड्यांवर पालिकेने केलेल्या कारवाईप्रकरणी त्या वेळचे भाजपा पदाधिकारी व नगरसेवक अनिल भोसले यांच्यासह काही व्यक्तींवर काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यंदाही बेकायदा झोपड्यांवर पालिका राजकीय दबावापोटी कारवाई करत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. या वेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर थेट आरोप करून त्यांच्याच दबावामुळे पालिका झोपड्यांवर कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. राजकीय दबावापोटी झोपड्यांवर होणारी कारवाई प्रशासनाने त्वरित थांबवावी. तसेच येथील अनेक घरांना पाण्याची सोय नसल्याने स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरात रस्त्यांची सोय नाही. बीएसयूपीची योजना रखडली असून ती त्वरित पूर्ण करून नागरिकांना घरे द्यावीत. येथील आदिवासीपाड्यात दवाखान्याची सोय नसल्याने रुग्णांना पायपीट करून शहरात यावे लागते. या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासन केवळ झोपड्यांनाच लक्ष्य करीत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. कारवाई थांबवून प्रशासनाने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात, या मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिले. त्यावर, आयुक्तांनी पालिका दबावाखाली कारवाई करीत नसून सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाई करीत आहे. झोपड्यांबाबत आदेश मिळाल्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. भोसले यांची राजकीय स्टंटबाजी अनिल भोसले यांच्या आरोपाचे खंडन करताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख शंकर वीरकर म्हणाले, नगरसेवक भोसले यांनी थेट आमदार प्रताप सरनाईक यांचा कारवाईशी संबंध लावला असून त्यांची ती राजकीय स्टंटबाजी आहे. स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासह आपला राजकीय भाव वाढवण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.