शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते वादळाचा शेतीमालालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंग‌ळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची ...

कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंग‌ळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची आवक झाली. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतीमाल विकण्यास व्यापाऱ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे फारसा मालही विकला गेला नाही.

एपीएमसीत सोमवारी तीन हजार २५४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला होता. सोमवारी आलेल्या वादळामुळे मंगळवारी पहाटे बाजारात केवळ एक हजार २३४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला. एपीएमसीत पुणे, जुन्नर, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतीमाल येतो. वादळामुळे शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो मंगळवारी पहाटेपर्यंत कल्याणमध्ये पोहोचू शकले नाहीत. कांदा, बटाट्याची वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक सोमवारी गुजरात आणि राजस्थानमधून आले होते. मात्र, मंगळवारी वादळामुळे शेतीमालाची आवक झाली नाही. फळे, भाजीपाल्याप्रमाणेच कांद्याची ९६० क्विंटल, बटाट्याची एक हजार ६३५ क्विंटल, तर अन्नधान्याची एक हजार ६६० क्विंटल आवक झाली आहे. तसेच सोमवारी कांद्याची दोन हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची एक हजार ३६० आणि अन्नधान्याची ९७४ क्विंटल आवक झाली होती.

कोरोनाकाळात केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण एपीएमसीतील बाजार सुरू आहे. केवळ ५० टक्के क्षमतेनेच गाळे सुरू ठेवून बाजार चालविला जातो. तसेच दर रविवारी एपीएमसी बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापाऱ्यांना फटका सहन करावा लागत असताना, आता ‘तौक्ते’चाही फटका बाजार समितीला सहन करावा लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-------

तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत शेतीमालाची आवक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीजपुरवठा खंडित असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता.

- श्यामकांत चौधरी,

सचिव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती

----------------------