शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांकडून मॅनेजमेंट गुरूंची शोधाशोध

By admin | Updated: June 11, 2017 02:51 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असल्याने प्रचार थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूकपूर्व सोशल मीडियावर

- राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्क

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असल्याने प्रचार थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूकपूर्व सोशल मीडियावर संदेशांच्या चाचपणीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी मॅनेजमेंट गुरूंची शोधाशोध सुरू झाली आहे.निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मॅनेजमेंट गुरूंची आवश्यकता असते. यामुळे पब्लिक रिलेशनसंबंधित काम करणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस येतात. अशा कंपन्या प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची भेट घेऊन त्यांना प्रचाराचा आराखडा सादर करतात. निवडणुकीचा प्रचार थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अशा कंपन्यांना काही राजकीय पक्षांकडून नियुक्त केले जाते. या कंपन्यांना मॅनेजमेंट गुरू संबोधले जात असले, तरी हे मॅनेजमेंट पूर्वी पक्षपातळीवरील तज्ज्ञांकडूनच केले जात होते. आजही ते सुरू असले, तरी सध्याच्या डिजिटल युगात मॅनेजमेंट गुरूंची आवश्यकता राजकीय पक्षांना भासू लागली आहे. अशा मॅनेजमेंट गुरूंची मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत अनेकदा नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्यांची शोधाशोध काही पक्षांकडून सुरू झाली आहे. तर, काहींनी नियुक्तीदेखील केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पक्ष व निनावी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ती संदेशांची चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यात उमेदवाराचे नाव तूर्तास नमूद नसले, तरी प्रचाराला मात्र सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नियुक्त केलेल्या कंपन्यांकडून प्रभागांचे सर्वेक्षण, त्यातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे, मतदारयाद्यांतील नोंद आदींचा आढावाही घेतला जातो. त्याचा दैनंदिन अहवाल स्थानिक नेतृत्व तसेच पक्षाच्या निवडणूक नियंत्रण पथकाला दिला जातो. यावरून, पक्षाची स्थिती व मतदारांची मानसिकता ठरवून प्रचाराची दिशा ठरवली जाते. यासाठी त्या कंपन्यांना मोठी रक्कम दिली जाते. काही पक्षांत स्वतंत्र तज्ज्ञांचे पथक नेमले जाते.