शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराच्या बिलांची होळी करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना महापालिकेकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना महापालिकेकडून वाढीव मालमत्ता कराची बिले २७ गावांतील नागरिकांना पाठविली जात असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीने वाढीव मालमत्ता कराच्या बिलांची होळी करण्याचा इशारा महापालिका प्रशासनास दिला.

मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या समितीच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. या बैठकीस समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सचिव चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, २७ गावांपैकी दहा गावांच्या हद्दीत कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. १,०८९ हेक्टर जागेवर ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी १,०८९ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली. ग्रोथ सेंटरच्या नावाखाली मोठे मेगा सिटी प्रकल्प या भागात आणले जात आहे. या प्रकल्पधारकांनी १०० एकरपेक्षा जास्त जागा घेतल्या आहेत. या भागात प्रकल्प उभे केले जात असले तरी सोयीसुविधा नाहीत. पाणी आणि रस्त्यांची समस्या आहे.

‘भविष्यात रस्त्यांवर येणार ताण’

मोठे गृहप्रकल्प उभारले जात असल्याने कल्याण शीळ आणि काटई-अंबरनाथ, खोणी -तळोजा या मार्गावर ताण येणार आहे. आताच या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर नागरी सोयीसुविधांवर ताण पडणार आहे. ग्रोथ सेंटरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. मात्र, तसे काही झाले नाही. भूमिपुत्रांना रोजगार मिळाला नाही, असे पाटील पुढे म्हणाले.

----------------------