शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पिसवली शाळेत वाईट विचारांची होळी

By admin | Updated: March 12, 2017 02:42 IST

स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, वृक्षतोड, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, रासायनिक रंगांचा वापर याबरोबरच शिक्षकांना उलट बोलणे, खोड्या काढणे, फुगे फोडणे, गैरहजर राहणे

डोंबिवली : स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, वृक्षतोड, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, रासायनिक रंगांचा वापर याबरोबरच शिक्षकांना उलट बोलणे, खोड्या काढणे, फुगे फोडणे, गैरहजर राहणे, अशा वाईट विचारांची होळी शनिवारी कल्याणनजीकच्या पिसवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली. विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व सांगताना चांगल्या-वाईट गोष्टी पटवून देण्यात आल्या. वाईट गोष्टी, विचार, सवयी त्यांना विचारून त्याच्या पताका बनवून त्या होळीला गुंडाळण्यात आल्या. तत्पूर्वी आजूबाजूचा कचरा गोळा क रून त्याची होळी तयार करण्यात आली होती. गावचे उपसरपंच प्रल्हाद भोईर, शाळा सुधार समिती अध्यक्ष विलास भोईर, सुनील भोईर यांच्या उपस्थितीत मुलींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. हा उपक्रम या शाळेत १० वर्षांपासून राबवला जात आहे.शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची सांगड विज्ञानाशी घालून मुलांना माहिती दिली. शर्मिला गायकवाड यांनी होळीकेची कथा मुलांना सांगितले. महेंद्र अढांगळे यांनी नैसर्गिक रंग तयार करून तेच वापरावेत तर सरिता काळे यांनी फुगे, पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विलास भोईर यांनी गावागावात साजऱ्या होणाऱ्या होळीपेक्षा पिसवली शाळेतील होळी-आगळी वेगळी आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विस्तार अधिकारी प्रेरणा नेवगी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, शहरी भागातील शाळांमधूनही अशा प्रकारचे उपक्रम राबविले गेल्यास विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंदर्भात जनजागृती होऊ शकेल असा सूर आळवण्यात आला. (प्रतिनिधी) नैसर्गिकरित्या होळी खेळण्याची शपथअजय पाटील यांनी नैसर्गिकरित्या होळी खेळण्याची शपथ मुलांना दिली. त्यानंतर नैसर्गिकपणे तयार केलेल्या कोरड्या रंगांनी धुळवड साजरी करून मुलांनी शिक्षक व ग्रामस्थांसह होळीचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सकारत्मक बदल झाला आहे, असे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले.