शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

महामार्ग हस्तांतरण फेरठराव बासनात

By admin | Updated: May 7, 2017 01:36 IST

आपल्या हद्दीतील रस्ते व राज्यमार्ग हस्तांतरणाचा ठराव या पूर्वीच झाला असल्याने याबाबतचा नवा ठराव बासनात गुंडाळण्यात

हितेन नाईक/  लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : आपल्या हद्दीतील रस्ते व राज्यमार्ग हस्तांतरणाचा ठराव या पूर्वीच झाला असल्याने याबाबतचा नवा ठराव बासनात गुंडाळण्यात आला. त्यामुळे हा विषय नगरपरिषदेच्या आजच्या सभेत आणण्याची आवश्यकता कोणाला आणि का भासली? याची खमंग आणि ओली चर्चा शहरवासियांत सुरु झाली आहे. त्यातच या विषयावरील मुख्याधिकाऱ्याच्या टिप्पणी मुळे हा विषय सभेसमोर येण्यापूर्वीच निकालात निघाला.लोकमतने शनिवारच्या अंकात ‘दारूची दुकाने वाचविण्यासाठी पालघर पालिकेची धावपळ’ अशी प्रसिद्ध झालेली बातमी आज पालघर मध्ये सर्वत्र चर्चेचा विषय बनली होती. अनेकांनी दारू सारख्या सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गोष्टीसाठी नगरपरिषदेचा चाललेला आटापिटा योग्य नसल्याचे सांगून लोकमतने मांडलेल्या या महत्वपूर्ण विषयाबाबत लोकमतचे आभार मानले. नगरपरिषदेच्या सभेपूर्वी ही बातमी आल्यानंतर नगरसेवकानीही सभेतील नगरपरिषद हद्दीतील रस्ते, राज्यमार्ग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबतच्या निर्णयापासून स्वत:ला दूर ठेवणे भाग पडले. पालघर नगर परिषदेची विशेष सभा नियोजित वेळे प्रमाणे आज सुरु झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद पडलेल्या परिमट रूम आणि दारूची दुकाने यांची वाट मोकळी करून देणारा रस्ते हस्तांतरणाचा विषय सभेसमोर चर्चेला आला. मात्र सभागृहाने या विषयाला प्रत्यक्ष साथ न देता संबंधीत रस्ते हस्तांतरणाविषयी नगर परिषदेच्या या पूर्वीच ठराव संमंत केले असून शासन स्तरावर त्या दृष्टीने कार्यवाही ही सुरु असल्याचे सांगून नवीन ठरावाची गरजच काय असा सवाल करून हा विषय बाजूला ठेवण्याची सूचना केली.  तत्पूर्वी मुख्यधिकाऱ्यानी ही या संबंधी शासन स्तरावरून कुठल्याही सूचना नसल्याने नगर परिषदेने स्वत: काही निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचे सुचवून सभेपुढील या विषयाचे अस्तित्व संपुष्टात आणले.लिकर लॉबीच्या आशेवर फिरले पाणीनगर परिषदेच्या आजच्या सभेत नव्याने या ठरावाची आवश्यकता नाही असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच त्याचे प्रतिबिंब नगरसेवकांच्या सूचनेत पाहावयास मिळाले.  नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे दारू दुकानदारांना नगर परिषदेकडून हवा असलेला ठराव नव्याने मंजूर करून घेण्यात अपयश आले व त्यामुळे बंद पडलेल्या दारू दुकानाचा झटपट खुला होण्याचा मार्ग यामुळे बंदच राहिला. न्यायालय काहीही निर्णय देवो आपण नगरपरिषदेला हाताशी धरून आपल्याला हवा तो निर्णय, ठराव करवून घेऊ शकतो. या परिमट रूम चालकांच्या व मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या घमेंडीवर साफ पाणी फिरल्याचे दिसून आले.