शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

आला पाऊस... आला पाऊस... ठाणेकरांच्या अंगणात

By admin | Updated: May 30, 2017 05:50 IST

उन्हाच्या काहिलीने अंगाची लाहीलाही झाल्याने ठाणेकर चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना आठवडाभरात पहिला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उन्हाच्या काहिलीने अंगाची लाहीलाही झाल्याने ठाणेकर चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना आठवडाभरात पहिला पाऊस कोसळणार असल्याचे संकेत पक्ष्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर यंदा पाऊस दमदार होणार असल्याचेही संकेत प्राप्त होत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला असल्याचेच संकेत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण देत आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाढल्या असून उकाड्याने प्रत्येकजण हैराण झाला आहे. केरळची वेस ओलांडून जलधारा महाराष्ट्रात कधी कोसळणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पक्ष्यांच्या संकेतावर पक्षी अभ्यासक पावसाचा अंदाज बांधतात. काही पक्ष्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या पावसाची सर ही ७ ते १० जूनदरम्यान येते. परंतु, यंदा पावसाच्या सरी सात ते दहा दिवस अगोदरच म्हणजेच आठवडाभराच्या आत कोसळतील. त्यानंतर, एक ते दोन दिवसांची विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा जोर पकडेल, असा अंदाज पक्षी अभ्यासक चैतन्य कीर यांनी वर्तवला आहे. पक्ष्यांच्या घरट्यांवरून पावसाच्या प्रमाणाचा अंदाज लावला जातो. कावळ्याने २० फुटांपेक्षा कमी उंचीवर घरटी बांधली असतील, तर अल्प प्रमाणात पाऊस, २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर घरटे बांधले असेल, तर अधिक पावसाची शक्यता असते. यंदा कावळ्याची घरटी ही २० ते २५ फुटांवर आढळून आली आहेत. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी समाधानकारक असल्याचा दावा कीर यांनी केला आहे. काही पक्षी पावसाळ्यात बाहेरील राज्यांतून मुंबईकडे येतात. उदा. नारिंगी डोक्याचा कस्तुर (आॅरेंज हेडेड ब्राऊन थ्रश), नवरंग, नाचणपक्षी. हे पक्षी ठाणे व मुंबई परिसरात दिसू लागले आहेत. चातक पक्षी हा पाऊस पडण्याच्या सात ते दहा दिवस अगोदर मुंबईकडे येतो. हा पक्षी ठाण्यातील नागला बंदरावर सात दिवसांपूर्वी आढळल्याचे पक्षी निरीक्षक अपूर्वा पाटील हिने सांगितले. साळुंखी व कबुतर हे मुसळधार पाऊस पडण्याच्या आधी इमारत किंवा एखाद्या झाडाच्या आडोशाला घोळक्याने दडून बसतात. सलग एक दिवसापेक्षा अधिक पाऊस पडणार असेल तर सर्वच पक्ष्यांची आधी खाण्याची वेळ बदलते. एरव्ही, सूर्यास्तापर्यंत खाणारे पक्षी सतत पडणाऱ्या पावसाच्या आधी सूर्यास्तानंतरही खाताना निदर्शनास पडतात. यावरून सतत पडणाऱ्या पावसाचा अंदाज बांधता येतो. घार व इतर शिकारी पक्षी हे जेव्हा पावसाळी ढगांच्या वर जातात आणि त्यांचे पंख इंचभर नजरेस पडतात, त्यावरून तासाभरात पाऊस पडायला सुरुवात होते, असा अंदाज बांधला जातो. खाडीकिनारी आढळणारे पक्षी नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने वेगाने उडायला लागले की, वादळी पावसाची शक्यता असते.