शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:13 IST

कोरोना आजाराच्या वाढत्या प्रमाणावर महापालिकेने आता ठाण्यातील दानशुर नागरीकांकडून मदतीचा हाताची अपेक्षा केली आहे. त्यानुसार भविष्यात हा आजाराचे वाढत प्रमाण लक्षात घेता, ही मदत द्यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.

ठाणे : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा साथरोग म्हणून घोषित केला आहे. भारतातही या साथीचा प्रसार होत असून ठाणे शहरातही या साथ रोगाने जवळपास १२ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. भविष्यात याची व्याप्ती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकिय उपकरणे, औषधी साठा, वस्तूंची गरज भासणार असून शहरातील दानशूर व्यक्तींनी करोना विरूद्ध लढण्यासाठी वैद्यकिय उपकरणे आणि औषधांसाठी मदत करण्याचे व या लढ्याला बळ देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.              ठाणे शहरातही कोरोना बाधीतांची संख्या वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या ठाणे शहरामध्ये आतापर्यंत एकूण १२ बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरनाविरूद्धचा हा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि यातील बाधितांना मदत करण्यासाठी मोठया प्रमाणात १०० व्हेंटिलेटर्स, एन ९५ मास्क, थ्री लेयर्स मास्क, मेडिकल गॉगल्स, हातमोजे, पीपीई किट्स आदी वैद्यकीय उपकरणांची आवश्कता भासणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औषधे आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या औषधांची गरज भासणार आहे. त्याचबरोबर शहरातील बेघर, भिकारी, स्थलांतरित कामगार यांच्यासाठी अन्न-धान्याचीही आवश्यकता आहे. यापूर्वीही ठाणे शहरातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ठाणेकरांच्या मदतीला धाऊन आले आहेत. विविध कंपन्यांनीही आपला मदतीचा हात पुढे केला होता. या पाशर््वभूमीवर या शहराचे हितचिंतक म्हणून कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण आपला मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, नगर रचना श्रीकांत देशमुख यांच्याशी ९४२३७७६१४५ या भ्रमणध्वनीवर संपर्कसाधावा असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या