शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांतील मृतांच्या वारसांना वर्षानुवर्षे भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:30 IST

अपघात दावा प्राधिकरणाचा निषेध : कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत तीन महिन्यांत ७४ अपघात

डोंबिवली : रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची रक्कम मिळण्यास सहा वर्षे वाट पाहावी लागत असून रेल्वेच्या कार्यपद्धतीचा प्रवासी महासंघाने निषेध केला आहे. पात्र कुटुंबांना न्याय देण्यासाठी वाडीबंदर व मस्जिद येथील रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाचे कामकाज गतिमान करण्याची मागणी शनिवारी महासंघाने केली आहे, अन्यथा महासंघ उग्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वेगाने संरक्षक उपाययोजना कराव्यात. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या काळात विविध ठिकाणच्या रेल्वे अपघातात सुमारे ७४ नागरिकांचे बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. अन्य ठिकाणीही अशा घटनांत वाढ झाल्याचे दिसते. गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणे, प्रवाशांची गर्दी व बेजबाबदारपणे रेल्वे रुळ ओलांडणे या कारणाने हे अपघात झाल्याची माहिती शेलार यांना रेल्वे सूत्रांनी दिली. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे क्षेत्रात रेल्वे अपघात व काही प्रमाणात आत्महत्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे लोहमार्ग पोलिसांवर कामाचा ताण वाढल्याने ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे यावर उपाययाेजनांची मागणी हाेत आहे.आर्थिक संकटामुळे आत्महत्यांत वाढकोरोना व लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक संकटामुळे धावत्या गाडीसमोर झोकून आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण लोहमार्ग पोलीस व मोटरमन आणि लोकोपायलट यांनी नोंदवल्याची माहितीही त्यांना मिळाली असल्याचे शेलार म्हणाले. त्यामुळे वाढते अपघात हे गंभीर असून यावर राज्य शासन, रेल्वे प्रशासन यांनी एकत्रित तोडगा काढण्याची गरज आहे. त्यावर प्रतिबंध घालावा व त्या उपाययोजनांसाठी प्रवासी महासंघ सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे