शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषीतांच्या पाहणीसाठी आरोग्य मंत्र्यांची अचानक पालघरला भेट

By admin | Updated: October 2, 2016 19:29 IST

- जव्हार येथील कुटीर रूग्णालयात रविवारी दुपारी ३.३० वाजता आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी अचानक भेट देऊन, रूग्णालयात दाखल असलेल्या कुपोषीत बालकांची पाहणी

हुसेन मेमन/ऑनलाइऩ लोकमत
 
पालघर, दि. 2 - जव्हार येथील कुटीर रूग्णालयात रविवारी दुपारी ३.३० वाजता आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी अचानक भेट देऊन, रूग्णालयात दाखल असलेल्या कुपोषीत बालकांची पाहणी करून विचारपुस केली. जव्हार, मोखाडा व विक्रमगड व वाडा तालुक्यात कुपोषणाने बळी पडत असलेल्या बालकांच्या पालकांना व संबंधित डॉक्टरांना विचारणा करून सॅम व मॅम ची एस. एन. सी. यु. वार्डातील बालकांची पाहणी केली. 
 
याबाबत मंत्री सावंत यंच्याशी चर्चा केली असता त्यांनी कुपोषीत बालकांची सद्य स्थिती काय आहे ? त्यांच्या वजनात वाढ होत  की नाही ? याकरीता जव्हार व मोखाडा दौरा करीत आहे असे त्यांनी सांगितले.  तसेच सॅम व मॅम मुलांचे मोनीटरींग करणे खुपच गरजेचे असुन त्यावर उपाय योजना केली जाईल व नविन प्रोटोकल तयार करून सॅम आणि क्रिटीकल सॅम अशी विभागणी करण्यात येणार असल्याचे  सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 
 
तसेच रूग्णालयात ६०० ग्रॅम वजनाचे बालके असून त्यांना लागणारे यंत्रणांचीही व्यवस्था लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. २०० खाटांची मंजुरी सन २०१२ ला मिळालेली असून अद्याप २०० खाट का बसविले जात नाही यावर त्यांनी पुढच्या बजेटमध्ये नक्कीच २०० खाटांची तरतूद केली जाईल व स्त्री व बालक रूग्णालयही वेगळे केले जाईल असे आश्वासन सावंत यांनी दिले.
जव्हारला विक्रमगड, मोखाडा येथून रूग्ण येतात त्यामुळे येथे रूग्ण जास्त प्रमाणात दाखल होतात, परिणामी एका खाटावर २ रूग्ण अशी वाईट अवस्था सध्या दिसत आहे, यावर जव्हारला विशेष बाब म्हणून लवकरच २०० खाटांची तरतुद करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.