शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांची घोषणा हवेतच?

By admin | Updated: August 13, 2015 23:11 IST

मीरा-भार्इंदरसह राज्यातील ३३ रुग्णालयांच्या धोरणात्मक निर्णयाची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी २०१४ मधील नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी

भार्इंदर : मीरा-भार्इंदरसह राज्यातील ३३ रुग्णालयांच्या धोरणात्मक निर्णयाची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी २०१४ मधील नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी आयोजित बैठकीत केली होती. त्यानुसार, पालिकेने टेंबा रुग्णालयाचा लेखाजोखा राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडे १५ डिसेंबर २०१४ रोजी पाठविल्यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ती घोषणा हवेतच विरली आहे. पालिकेचे रखडलेले टेंबा रुग्णालय सुरू करण्यास आर्थिक कुवत नसल्याचे स्पष्ट केल्या नंतरही सर्वोच्च न्यायालयाने हे रुग्णालय पालिकेनेच चालवावे असा निर्णय सप्टेंबर २०१४ मध्ये दिला आहे. येत्या तीन वर्षांत हे रुग्णालय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु, हे रुग्णालय चालविणे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याने रुग्णालयाच्या खर्चासाठी जुलै २०१५ मधील महासभेने अशासकीय निधी स्वीकारण्याच्या धोरणाला मान्यता दिली आहे. तत्पूर्वी रुग्णालय राज्य शासनामार्फतच चालविण्याचा ठराव आॅगस्ट २०१२ मधील महासभेत मंजूर करून तो दिवाणी अर्जाच्या माध्यमातून परवानगीसाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने तो फेटाळून रुग्णालय पालिकेनेच चालविण्यावर शिक्कामोर्तब केले. शासनाच्या माध्यमातून टेंबा रुग्णालयासह राज्यातील ३३ रुग्णालये चालविण्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आरोग्यमंत्र्यांनी ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत टेंबा रुग्णालयासह राज्यातील ३३ रुग्णालयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. त्या वेळी टेंबा रुग्णालय प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान होऊ नये, यासाठी शासकीय धोरणात्मक निर्णय जाहीर झाल्यानंतरच पालिकेने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली होती. निर्णयाची अंमलबजावणी लवकर होण्यासाठी पालिकेने टेंबा रुग्णालयाचा लेखाजोखा राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्याकडे १५ डिसेंबर रोजी पाठविला होता. याबाबत आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या निर्णयाच्या पाठपुराव्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.