शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

कोणी पाहिली का हो ‘अबोली’?

By admin | Updated: February 17, 2017 02:08 IST

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य परिवहन विभागाने अबोली रंगाच्या रिक्षांची खास तरतूद केली. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग यशस्वीही

प्रशांत माने / कल्याणमहिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य परिवहन विभागाने अबोली रंगाच्या रिक्षांची खास तरतूद केली. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग यशस्वीही झाला. मात्र, कल्याण आरटीओच्या हद्दीत २७ महिलांनी या रिक्षांचे परमिट घेतले आहे. त्यापैकी आठ जणींनी रिक्षाही घेतल्या आहेत, मात्र त्या रस्त्यावर धावताना दिसत नाहीत.महिलांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी अबोली रिक्षांचा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. अन्य शहरांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची सबलीकरणाकडे वाटचाल सुरू असताना कल्याण हद्दीत मात्र याउलट चित्र आहे. ठाणे शहरात सुमारे २५ हजारांहून अधिक रिक्षा धावतात. ठाण्यात घडलेल्या स्वप्नाली लाड प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अबोली रिक्षा सुरू करताना महिलांच्या सुरक्षेचा हेतूही समोर होता. ठाण्यात अबोली रिक्षाच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ९० च्या आसपास महिला रिक्षा चालवत आहेत. दुसरीकडे कल्याण आरटीओने २७ महिलांना अबोली रिक्षाचे परमिट दिले आहे. यातील आठ महिलांनी रिक्षाही घेतल्या आहेत. परंतु, यातील एकही रिक्षा अजूनही रस्त्यावर धावलेली नाही. परमिट घेतले, मग रिक्षा चालवणार तरी कधी, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. परमिट घेऊन ते अन्य रिक्षाचालकांना चालवण्यास दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी आरटीओने करणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)