शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

* ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकमधील नौपाडा आणि मुंब्रा भागात मोबाइल चोरी आणि जबरी चोरीचे प्रमाण अधिक आहे. ...

* ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकमधील नौपाडा आणि मुंब्रा भागात मोबाइल चोरी आणि जबरी चोरीचे प्रमाण अधिक आहे. नौपाडयातील तीनहातनाका भागात रिक्षातून जाणाऱ्या तरुणीचा मोबाइल चोरट्‌यांनी हिसकावला. यातच तिचा मृत्यू झाला.

* त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील डोंबिवली अर्थात विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हे प्रमाण लक्षणीय आहे.

* उल्हासनगर परिमंडळात अंबरनाथमध्येही मोबाइल चोरी अधिक आहे.

* तर वागळे इस्टेट परिमंडळात कापूरबावडी भागातही मोबाइल चोरट्‌यांचा उपद्रव अधिक आहे.

* मोबाइल चोरीस जाताच तातडीने हे करा...

मोबाइल चोरीस गेल्यानंतर तातडीने सीम कार्ड ब्लॉक करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही, तर मोबाइल चोरणाऱ्याकडून त्याद्वारे खंडणी उकळणे, अश्लील मेसेज पाठविणे असे प्रकार घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मोबाइल चोरीनंतर तक्रार करण्याआधी ही खबरदारी घेणेही गरजेचे असल्याचा सल्ला नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिला आहे.

* ५० टक्के मोबाइलचा तपास लागतच नाही

गेल्या दीड वर्षात ठाणे आयुक्तालयातून ४४२ मोबाइलची चोरी झाली आहे. यातील केवळ ६८ मोबाइलचा शोध लागला. हे प्रमाण २५ टक्के आहे. यथावकाश आणखी २५ टक्के मोबाइल परत मिळतील. म्हणजेच ५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही, असे पोलीसही खासगीत मान्य करतात.

...............

* मोक्कासारखी कडक कारवाई करणार

सध्या महागडया मोबाइलवर सोशल मीडियाच्या साईट्‌स अनेकजण न्याहाळत असतात. अशावेळी त्यांची मोबाइलवरील पकड सैल होते. हीच संधी साधून मोबाइल हिसकावण्याचे प्रकार होतात. महिलांनी मोबाइल पर्समध्ये ठेवून ब्ल्यू टूथ किंवा एअरफोनचा वापर करता येईल. मोबाइल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी त्या त्या भागात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाढविले आहे. अशा चोरट्‌यांवर मोक्कासारखी कडक कारवाई करण्याचाही विचार सुरू आहे.

- संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर