शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा इमारतीवर हातोडा

By admin | Updated: December 23, 2015 00:34 IST

औद्योगिक वसाहतीच्या निवासी भागातील चार मजली बेकायदा इमारत मंगळवारी एमआयडीसीने पाडली. एमआयडीसीच्या जागेवर अनेक बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले असताना

डोंबिवली : औद्योगिक वसाहतीच्या निवासी भागातील चार मजली बेकायदा इमारत मंगळवारी एमआयडीसीने पाडली. एमआयडीसीच्या जागेवर अनेक बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले असताना अवघ्या एका इमारतीवर कारवाई केल्याने तो चर्चेचा विषय बनला. मात्र बेकायदा इमारतीवर कारवाईचा हातोडा पडल्याने त्या भागातील इतर बेकायदा इमारतींत राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.निवासी भागात वीज वितरण कंपनीच्या आवारालगत गावदेवी मंदिरापासून आत चार मजली इमारतीचे बेकायदा बांधकाम नव्याने सुरु होते. त्याबाबत एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयाकडे तक्रार आल्याने मोठ्या पोलिस बंदोबस्तात तीन जेसीबी, दोन डंपरच्या साह्याने ही इमारत पाडण्यात आली. तेथे तळमजल्यावर काही रहिवासी होते, पण पहिला, दुसरा आणि तिसरा मजला मजला रिकामा होता. आत्मदहनाचा इशाराहे बांधकाम मी केले होते. जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. तिचा सातबारा आमच्या नावे आहे. भूमी अभिलेखा विभागाकडून जागेची मोजणी करुन रितसर परवानगी घेऊन बांधकाम करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे, त्याचा तपशील अधिकाऱ्यांना देऊनही इमारत तोडण्यात आल्याचा आरोप हे बांधकाम करणारे हरिश्चंद्र भोईर यांनी केला. तळमजल्यावर ५२ कुटुंबे राहत होती. ती बेघर झाली. इमारत पाडल्यावर माझे होणारे नुकसान कोण भरुन देणार? त्यामुळे मला आत्मदहन करण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी उद््वेग व्यक्त केला. चाळींना आयुक्तांचे अभय?आजदे, सागाव, सांगर्ली ही गावे औद्योगिक परिसराला लागून आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी आणि इमारती एमआयडीसीच्या जागेवर उभ्या आहेत. त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते, असा आरोप पाडलेल्या इमारतीतील रहिवाशांनी केला. ही २७ गावे महापालिकेत आली. तेथील पाणीबिले, मालमत्ता कराची वसुली आयुक्त ई. रविंद्रन सुरू केली. पण या गावांत फोफावलेल्या चाळी आणि बड्या बेकायदा इमारतींविरोधात आयुक्त कारवाईचा इशारा का देत नाहीत, असा प्रश्नही अन्य रहिवाशांनी उपस्थित केला.