शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीमध्ये उभारलेल्या झोपड्यांवर हातोडा

By admin | Updated: December 24, 2016 03:01 IST

भार्इंदरच्या राई, शिवनेरीनगर येथील खारफुटीची मोठमोठी झाडे कापून तसेच भराव करून बांधलेल्या झोपड्यांवर महसूल

मीरा रोड : भार्इंदरच्या राई, शिवनेरीनगर येथील खारफुटीची मोठमोठी झाडे कापून तसेच भराव करून बांधलेल्या झोपड्यांवर महसूल विभागाने महापालिकेच्या सहकार्याने तोड कारवाई केली. शिवनेरीनगर शासकीय जमिनीवर असून सीआरझेड-१ मध्ये आहे. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या भागाची पाहणी करून कारवाईचे आदेश दिले होते. महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने येथील खारफुटीची मोठमोठी झाडे सर्रास कापून, त्यात भराव करून कच्ची तसेच पक्की बांधकामे झाली आहेत. तसेच या भागात येथे करआकारणी, पाणीजोडणी, शौचालय, रस्ते, भराव, अन्य झाडांची लागवड होत आहे. रिलायन्स एनर्जीकडून वीजपुरवठा केला जातो. या परिसरात भूमाफिया सक्रिय असून सरकारी जागेतील कच्च्या झोपड्या वा पककया खोल्या विकून ते मोकळे होत आहेत. येथील बांधकामांप्रकरणी तक्रारी होत असताना महापालिका मात्र सरकारी जमीन असल्याचे सांगत स्वत:ची जबाबदारी झटकून टाकते. महसूल विभागाकडूनही मनुष्यबळाअभावी कारवाईस विलंब होतो.त्या अनुषंगाने येथील गल्ली क्र. १ ते ३ परिसराच्या शेवटी नव्याने झालेल्या कच्च्या पत्र्याच्या झोपड्या मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात तोडून टाकल्या. या ठिकाणी जेसीबी येण्याचा मार्ग नसल्याने हातानेच तोड कारवाई करावी लागली. (प्रतिनिधी)