शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: May 14, 2016 00:57 IST

दोन दिवसांपासून केडीएमसीची रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू असून या कारवाईअंतर्गत अ, ब, क, ह प्रभाग क्षेत्रांतील बांधकामे तोडण्यात आली.

कल्याण : दोन दिवसांपासून केडीएमसीची रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू असून या कारवाईअंतर्गत अ, ब, क, ह प्रभाग क्षेत्रांतील बांधकामे तोडण्यात आली. शुक्रवारी संतोषीमाता मंदिर रोड परिसरातील तेजश्री बिल्डिंगजवळील तळ अधिक एक मजली प्रीतम आणि ताकवणे सदन ही दुमजली इमारत ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांच्या पथकाकडून तोडण्यात आली. या इमारती ३५ वर्षे जुन्या होत्या आणि रस्ता रुंदीकरणात बाधित ठरत होत्या. पोकलेन, जेसीबी आणि महापालिकेच्या १५ पंधरा कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने त्या तोडण्यात आल्या. या वेळी अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनहल पाटील, ड प्रभाग अधिकारी शांतिलाल राठोड आणि कार्यकारी अभियंता दहपक भोसले उपस्थित होते. क प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्या पथकाने काळातलाव, काळी मशीद रोडवरील चार घरे तोडली. तर, गुरुवारी डोंबिवली पश्चिम येथील श्रीधर म्हात्रे चौक ते सुभाष रोड रस्ता १५ मीटर रुंद रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या १३ बांधकामांवर प्रभाग क्षेत्र अधिकारी ह पराशुराम कुमावत, फ प्रभाग अधिकारी भरत जाधव यांनी कारवाई केली. तसेच ब प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत चिकणघर परिसरातील लॉर्ड शिवा पॅरेडाइज ते मंगेशी रोडलगत असलेला बंगला तोडण्यात आला. (प्रतिनिधी)गुरुवारी कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर शुक्रवारीदेखील महापालिकेची ही कारवाई सुरूच होती. दिवसभरात तब्बल २२५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. सकाळी कळवा चौकातून या कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये कळवा सुपर मार्केट, घड्याळ चौक, आईनगर, बुधाजीनगर, रमाबाई चौक, राणा टॉवर, गांधीनगर, कळवा स्टेशन रोड, कळवा भाजी मार्केट ते परत कळवा चौक या परिसरात जोरदार कारवाई करून जवळपास २२५ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब यांच्या अधिपत्याखाली उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, सहायक आयुक्त शंकर पाटोळे, सागर घोलप यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.