शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या कचरागाड्यांवर ‘जीपीएस’

By admin | Updated: June 20, 2017 06:18 IST

केडीएमसीने २२५ कचरा गाड्यांवर जीपीएसप्रणाली बसवली आहे. त्यामुळे या गाड्या आॅनलाइन ट्रेकिंगवर आल्या आहेत. या प्रणालीमुळे कचरा वाहतुकीत केली जाणारी फसवणूक व खोटेपणा टाळता येणार आहे

मुरलीधर भवार। लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीने २२५ कचरा गाड्यांवर जीपीएसप्रणाली बसवली आहे. त्यामुळे या गाड्या आॅनलाइन ट्रेकिंगवर आल्या आहेत. या प्रणालीमुळे कचरा वाहतुकीत केली जाणारी फसवणूक व खोटेपणा टाळता येणार आहे. त्यातील सत्यता पडताळणे महापालिकेच्या मुख्यालयातून एका क्लिकवर शक्य होणार आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी ही माहिती दिली आहे. महापालिकेच्या प्रभागांमधील कचरा २२५ गाड्यांद्वारे गोळा करून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. या गाड्यांवरआता जीपीएस प्रणाली बसवल्याने कोणती गाडी कोणत्या प्रभागात किती वाजता कचरा गोळा करण्यासाठी गेली, ती तेथे किती वेळ उभी होती, किती टन कचरा गोळा केला, या गाडीच्या किती फेऱ्या झाल्या, यावर महापालिका मुख्यालयात बसून देखरेख ठेवता येणार आहे. त्याचबरोबर गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचाही लेखाजोखा यातून उघड होणार आहे. गाडी किती वेळा गॅरेजला गेली, त्यात किती वेळा इंधन भरले गेले. इंधन भरले तर गाडी खरोखरच किती किलोमीटर चालली, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. जीपीएस आॅनलाइन व्हेइकल ट्रेकिंग सिस्टीम बसवण्यासाठी महापालिकेने एक कोटी ४२ रुपये खर्च केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केपीएमजी कंपनीने ही प्रणाली बसवली आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर कामास सुरुवात केली आहे. कचरा गाड्यांवरील जीपीएस यंत्रणा स्मार्ट सिटीसाठी अत्यंत पूरक ठरणार आहे. त्यामुळे कचरा गाड्यांचे नियंत्रण स्मार्ट झाले असल्याचा दावा उपायुक्त तोरस्कर यांनी केले आहे. पालिकेचे माजी सचिव सुभाष भुजबळ हे गाडीचा वापर करत नव्हते. तरीही ते महापालिकेचा वाहन भत्ता घेत होते, या आशयाची तक्रार माहिती अधिकराचे कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी केली होती. जीपीएस प्रणाली नसल्याने भुजबळ यांच्या गाडीवापराविषयी शहानिशा करणे महापालिकेस शक्य नव्हते. हे प्रकरण लक्षात घेऊन महापालिकेच्या अन्य वाहनांवरही जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे.