शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्व अभियानांतर्गत होणार शासकीय जत्रा

By admin | Updated: November 17, 2016 07:23 IST

राजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत येत्या २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान शासकीय जत्रेचे आयोजन केल्याचे तहसीलदार सर्जेराव मस्के-पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

मुरबाड : मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून नागरिकांची शासनदरबारी गेले अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तत्काळ निकाली काढून त्यांना अत्यावश्यक लागणारे दाखले तसेच शासकीय योजनांचे लाभ त्वरित मिळवून देण्यासाठी राजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत येत्या २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान शासकीय जत्रेचे आयोजन केल्याचे तहसीलदार सर्जेराव मस्के-पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.मुरबाड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर तसेच कल्याण-शहापूर या तालुक्यांतील गावांचाही समावेश होत असल्याने त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण व शहापूर या ठिकाणी असलेल्या तहसीलदार, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, राज्य परिवहन विभाग, एमआयडीसी, एसटी महामंडळ, वन विभाग, तालुका कृषी, आरोग्य विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी वेळोवेळी हेलपाटे मारावे लागतात. परिणामी, अधिकारीवर्ग हा वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्यांना आर्थिक भारही सोसावा लागतो. या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात या शासकीय जत्रेचे आयोजन केले असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेचा व श्रावण बाळ योजनेचा लाभ, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रि मिलेअर, वास्तव्य, जन्ममृत्यूचे दाखले, आरटीओचे लायसन्स, शिवाय तालुका कृषी विभागामार्फत विविध योजनांचा लाभ, नगरपंचायत व नगरपालिका यांच्या विविध योजनांचे लाभ, पंचायत समितीस्तरावरून असलेल्या विविध योजनांचे लाभ व अत्यावश्यक अशा सुमारे २ लाख ५० हजार नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप आणि योजनांचा लाभ देण्याचा संकल्प कथोरे यांनी केला आहे. (वार्ताहर)