शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गुडमॉर्निंग पथकाचा भिवंडीत फार्स

By admin | Updated: March 14, 2017 01:40 IST

दोन-तीन दिवसांपासून भिवंडीतील विविध ठिकाणी सकाळी गुडमॉर्निंग पथक फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना दोन किलोमीटरवर सोडण्याची कारवाई करते आहे.

भिवंडी : दोन-तीन दिवसांपासून भिवंडीतील विविध ठिकाणी सकाळी गुडमॉर्निंग पथक फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना दोन किलोमीटरवर सोडण्याची कारवाई करते आहे. मंौजे फेणेपाडा येथे तीन हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. तेथील सार्वजनिक शौचालय तुडूंब घाणीने भरलेले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने भाजपाचे माजी शहराध्यक्ष श्याम अग्रवाल यांनी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची देखरेख केली जात नाही किंवा निगा राखली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. परिणामी नागरिकांना जवळच्या जंगलात उघड्यावर जावे लागत आहे. तेथे मनपाचे गुडमॉर्निंग पथक जाते. नागरिकांना पकडून दोन किलोमीटर लांब सोडते. पण मूळ प्रश्न सोडविणे आपल्याच हाती असूनही तो सोडवत नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे. या प्रकरणात आता पालिका आयुक्तांनीच लक्ष घालून शौचालयांच्या स्वच्छतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शौचालय पूर्ववत सुरू करावे. अन्यथा नागरिकांचे गुडमॉर्निंग पथक अधिकाऱ्यांना दोन किलोमीटरवर सोडून येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.कोंबडपाडा भागात १३ कुटुंबे विना शौचालयाची असून त्यापैकी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय अनुदानातून पालिकेने वैयक्तिक वापरासाठी दोन कुटुंबांना शौचालये बांधून दिली होती. ती शौचालये गावगुंडांनी तोडून टाकली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याने फौजदारी गुन्हा न नोंदविता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवित नागरिकांची बोळवण केली. त्यामुळे आता उपायुक्त अनिल डोंगरे व स्वच्छता अधिकारी सुभाष झळके यांनी पुढाकार घेऊन येथील सर्व कुटुंबांसाठी पुन्हा शौचालये बांधून देण्यासाठी पुढाकार घ्यावा,अशी मागणी समाजवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)