शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:12 IST

सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्सरेची सुविधा; चार महिन्यांत ५६२ रुग्णांचे सिटी स्कॅन

- पंकज रोडेकरठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्सरे यासारख्या सुविधांमुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना आता कुठे अच्छे दिन आले आहेत. या सुविधा सुरू झाल्यापासून, म्हणजे चार महिन्यांत ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ५६२ रुग्णांचे सिटी स्कॅन केले असून १०० रुग्णांचे डिजिटल एक्सरे काढले आहेत. अपघाताच्या घटनांमधील रुग्णांना या सुविधांचा सर्वाधिक लाभ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.शहरी भागासह ग्रामीण भागातील गोरगरिबांचे रु ग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रु ग्णालय ओळखले जाते. पण, मागील काही वर्षांपूर्वी येथील सिटी स्कॅ न मशीन बंद पडल्याने गोरगरिब रुग्णांना वारंवार खाजगी रुग्णालयांत सिटी स्कॅन करण्यासाठी जावे लागत होते. अन्य विविध कारणांमुळेही हा विभाग रुग्णालयात पुन्हा सुरू होऊ शकला नाही. हा विभाग सुरू करण्यासाठी तत्कालीन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातच, ठाणे नियोजन समितीच्या बैठकीतही सिटी स्कॅन मशीनसाठी काही निधी उपलब्ध झाला होता. मात्र,जागेअभावी हा विभाग सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर, जिल्हा शल्यचिकित्सकपदाची धुरा डॉ. कैलास पवार यांनी स्वीकारल्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या मुद्यांपासून बरेच मुद्दे मार्गी लागले. या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची सिटी स्कॅन करण्यासाठी होणारी धावपळ आणि खाजगी ठिकाणी होणारी लूट लक्षात घेता, त्यांनी सिटी स्कॅन मशीनपासून डिजिटल एक्सरेसारखे विभाग तातडीने सुरू करण्यासाठी अपघात विभाग इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देत, तेथे तातडीने हे विभाग सुरू करण्यासाठी पावले उचलली. या विभागांचा सप्टेंबर २०१९ मध्ये शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.या विभागात ५६२ रुग्णांचे माफक दरात सिटी स्कॅन करण्यात आले. तसेच १०० रुग्णांचे डिजिटल एक्सरे काढल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.हा विभाग सुरू झाल्यानंतर गरजू रुग्णांना फायदा होत आहे. या विभागात गोरगरीब रुग्णांचे माफत दरात सिटी स्कॅन व डिजिटल एक्सरे काढण्यात येत आहेत. हे विभाग झाल्यापासून आतापर्यंत ५६२ रुग्णांचे सिटी स्कॅन, १०० रुग्णांचे डिजिटल एक्सरे काढले आहेत.- डॉ. कैलास पवार, शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय