शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला आमची जागा परत द्या; पोलिसांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:27 IST

शहरातील जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याने प्रांत कार्यालय कोणत्याही चौकशीविना बंद वसाहती व विविध सरकारी कार्यालयांच्या कब्जातील जागेवर सनद देण्याचे काम सुरू केले.

उल्हासनगर : प्रांत कार्यालयाने पोलीस वसाहतींवर सनद देण्याचा प्रकार उघड झाल्यावर महापालिकेसह विविध सरकारी विभागांचे धाबे दणाणले आहे. पोलीस ठाणे, पोलीस वसाहतीसह आरक्षित भूखंडाला मिळकतपत्र पोलीस प्रशासनाच्या नावे द्या, अशी मागणी पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी प्रांत कार्यालयाला केली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं.-४, विठ्ठलवाडी पोलीस ठाणेअंतर्गत पोलीस वसाहतींवर प्रांत कार्यालयाने चौकशीविना सनद दिल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. त्यानंतर, पोलीस प्रशासनाला जाग येऊन सहायक पोलीस आयुक्तासह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी प्रांत कार्यालयात धाव घेतली. सनद दिलेली जागा पोलीस वसाहतीची असल्याची माहिती प्रांत कार्यालयाला दिली. वसाहतीच्या बैठ्या चाळी धोकादायक असल्याने वसाहतींच्या खोल्या बंद ठेवल्याची माहिती प्रांताधिकारी जगजितसिंग गिरासे यांना दिली. तेव्हा चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले.

शहरातील जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याने प्रांत कार्यालय कोणत्याही चौकशीविना बंद वसाहती व विविध सरकारी कार्यालयांच्या कब्जातील जागेवर सनद देण्याचे काम सुरू केले. यामध्ये भूमाफिया, प्रांत कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी, स्थानिक नेते गुंतल्याची चर्चा सुरू होऊन कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची टीका होत आहे. महापालिका मुख्यालय, प्रभाग समितीसह इतर कार्यालये व आरक्षित भूखंड, उद्याने, मैदाने बनावट सनदच्या संकटात सापडली. सनद प्रकाराची भीती विविध सरकारी कार्यालये व त्यांच्या खुल्या जागेला निर्माण झाली आहे. त्यांच्या जागेची मालकी अद्यापही राज्य सरकारची असून त्यांनी स्वत: पाठपुरावा करून मिळकतपत्र घेणे गरजेचे झाले आहे.

जागेची मालकी राज्य सरकारचीमहापालिका मुख्यालयासह इतर कार्यालये, पोलीस ठाणी, पोलीस बंद वसाहतींसह त्यांच्या खुल्या जागेची मालकी राज्य सरकारची आहे. ताब्यातील जागा स्वत:च्या नावाने करण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी प्रांत कार्यालयाने महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर हिराघाट, आयडीआय कंपनीजवळील भूखंड, व्हीटीसी मैदाने व इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेची मालकी महापालिकेकडे प्रांत कार्यालयाने हस्तांतरित केली आहे. तशीच जागेची मालकी हस्तांतरित केली.

बंद खुल्या जागा धोक्यातशहरातील एमजेपीच्या खुल्या जागा व बंद वसाहती, सरकारी बालगृहे, वसतिगृहे, सरकारी विश्रामगृह, पोलीस ठाणे व बंद वसाहती, सरकारी गोदामाच्या जागांवरील बंद गोदामे, पालिकेचे आरक्षित भूखंड, जुन्या आयटीआय केंद्राची जागा, खुली बीएसएनएलची जागा आदी अनेक सरकारी कार्यालयांच्या जागेवर केव्हाही सनद मिळण्याची भीती निर्माण झाली. सनद टाळण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा करून जागेची मालकी मिळवणे गरजेचे झाले आहे.