ठाणे : गायमुख चौपाटी येथे दशक्रिया घाट व विसर्जन घाटाचे काम पूर्ण करून त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेने मंगळवारी महापौर यांच्याकडे केली.
गायमुख चौपाटी सुरू होण्यापूर्वी गणेश विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाट पूर्ण करू, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते. पण, चौपाटीचे उद्घाटन झाले आणि आता क्रूझ बोटीचे उद्घाटनसुद्धा होणार आहे. परंतु, विसर्जन घाट व दशक्रिया विधी घाटाकडे लोकप्रतिनिधींनी किंबहुना ठाणे महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच, चौपाटीच्या येथे भूमिपुत्रांना रोजगारासाठी प्राधान्य देऊ, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते. या ठिकाणी इतर लोकांना रोजगार देऊन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी केला आहे.