शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

‘दिवाळीआधी कंत्राटी कामगारांना बोनस द्या’

By admin | Updated: October 12, 2016 04:02 IST

महापालिकेच्या विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुधारित किमान वेतन द्यावे, असा आदेश शासनाने देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने

ठाणे : महापालिकेच्या विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुधारित किमान वेतन द्यावे, असा आदेश शासनाने देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जे किमान वेतन ठरवून देण्यात आले आहे, त्यातील एक वेतन हे या वर्षीचा सानुग्रह अनुदान म्हूणन दिवाळीच्या १५ दिवस आधी देण्याची मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या काळवा हॉस्पिटल, घंटागाडी, रस्ते साफसफाई, सॅटीस, शिक्षण विभाग, ड्रेनेज, कोपरी प्रसूतिगृह, पाणी खाते, परिवहन सेवा व इतर विविध विभागांत सुमारे २ हजार कंत्राटी कामगार काम करत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे किमान वेतन सुधारित केले असून २५ फेब्रुवारी २०१५ रोजी तसा अध्यादेशदेखील काढला आहे. कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत २९ आॅगस्ट २०१६ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका कंत्राटी कामगारांना या अध्यादेशानुसार किमान वेतनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठामपा प्रशासनाला दिले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्यापही न झाल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या अध्यादेशानुसार १४ हजार ८६८ वेतन अदा करणे प्रशासनावर बंधनकारक असल्याची माहिती कामगार नेते रवी राव यांनी दिली. जे किमान सुधारित वेतन ठरवण्यात आले आहे. त्यातील एक वेतन सर्व कंत्राटी कामगारांना या आर्थिक वर्षासाठी बोनस म्हणून दिवाळीच्या १५ दिवस आधी देण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.